आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनवेळा लग्न, दीड वर्षांची मुलगी तरीही मैत्रिणी बरोबर समलैंगिक संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या गाडीत बसलेल्या दोन्ही मैत्रिणी - Divya Marathi
पोलिसांच्या गाडीत बसलेल्या दोन्ही मैत्रिणी
मधुबनी (बिहार) - मधुबनी जिल्ह्यातील 24 आणि 17 वर्षांच्या दोन मैत्रिणींच्या समलैंगिक संबंधाने पोलिसांच्या नाकात दम आणला आहे. दोघीजणी घरातून पळून गेल्या होत्या. पोलिसांनी गुडगाव येथून त्यांना शोधून आणले, मात्र दोघींनी घरी जाण्यास नकार दिला आहे.
पोलिस स्टेशनमध्ये दोघींनी सांगितले, की आम्ही बालपणीच्या मैत्रिणी आहोत. एकमेकींना सोडून आम्ही जगू शकत नाही. दोघीही वेगवेगळ्या धर्माच्या आहेत. यातील 24 वर्षांच्या महिलेला एक दीड वर्षांची मुलगी देखील आहे. विशेष म्हणजे तिचे दोन लग्न झाले मात्र दोन्ही नवऱ्यांबरोबर तिचे जमले नाही आणि सध्या ती माहेरी राहात आहे. तिला दुसऱ्या पतीपासून मुलगी आहे.
काय आहे प्रकरण
मधुबनी जिल्ह्यातील खुटौना पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परसा गावातील हे प्रकरण आहे. शेजारी राहात असलेल्या दोन मैत्रिणींमध्ये शारीरिक संबंध असल्याचे कळाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्यावर वेगळे राहाण्याचा दबाव टाकला. त्यानंतर 15 दिवसांनी त्या गावातून पळून गुडगावला गेल्या. तिथे एका कारखान्यात काम करुन त्यांनी उपजिवीका सुरु केली होती. विवाहित महिला तिच्या पतीसोबत गुडगावला आधीही आली होती, त्यामुळे तिला गुडगावबद्दल माहिती होती. दरम्यान दुसऱ्या मुलीच्या वडिलांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत तिचा गुडगावपर्यंत शोध घेतला आणि दोघींना पकडून आणले.
पुढे काय
पोलिसांनी गुरुवारी दोघींची वैद्यकीय तपासणी केली. आता त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. कोर्ट काय आदेश देते याकडे पोलिस आणि गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.