आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीसोबत कारागृह अधीक्षकांचे सुरु होते अश्लील चाळे, व्हिडिओ झाला व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुरुंगाच्या जवळच असलेल्या एका घरात सुरु होते पांडचे चाळे. - Divya Marathi
तुरुंगाच्या जवळच असलेल्या एका घरात सुरु होते पांडचे चाळे.
किशनगंज - बिहारच्या किशनगंज जिल्हा कारागृहाचे अधीक्षक कृपाशंकर पाडेंचा एका युवतीसोबतचा आक्षेपार्ह्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ सोमवारी सकाळी 11 वाजता शूट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. युवती सुभाष पल्ली भागातील एका किराना दुकानदाराची मुलगी असून ती जेलमध्ये सामान देण्यासाठी गेली होती.

कारागृह अधीक्षकाच्या मौज-मस्तीचा अड्डा होते दुकानदाराचे घर
- पोलिस अधीक्षक राजीव रंजन यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी कामिनी बाला यांना चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.
- कामिनी बाला यांनी सांगितले, पांडे यांनी कारागृहात युवतीसोबत असल्याचे मान्य केले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तो स्वतः असल्याचेही त्याने मान्य केले आहे. मात्र युवतीला मी मुली समान मानतो असेही सांगितले आहे.
- बाला म्हणाल्या, 'व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे ते बाप आणि मुलीच्या नात्याला शोभेल असे दिसत नाही. ते सर्व आक्षेपार्ह्य आहे.'
- गेल्या दोन वर्षांपासून किराना दुकानदाराचे घऱ कारागृह अधीक्षकाचा मौज-मस्तीचा अड्डा राहिलेले आहे.
- यावेळी त्याला साहित्य पुरवठ्याचे कंत्राट मिळाले नाही तेव्हा पांडेने त्याला ऑर्डर मिळवून देण्याचे आश्वास दिले होते.

कृपाशंकर पांडेवर कैद्यांवर लैगिक अत्याचाराचा आरोप
- कारागृह अधीक्षक पांडेवर सात महिन्यांपूर्वीही लैंगिक अत्याचाराची तक्रार झाली होती. तेव्हा तो तुरुंग अधिकारी होता.
- तत्कालिन डीएम अनिमेष पाराशर यांनी पांडेच्या कृत्यांची माहिती तुरंग महासंचालकांना पाठवली होती.
- त्यानंतर त्याच्यावर कारवाई ऐवजी दोन महिन्यात पांडेला प्रमोशन मिळाले आणि तो अधीक्षक झाला. त्याच्या गैरकृत्यांमध्ये वाढ होत गेली.

पांडे म्हणाले - तुम्हाला अश्लिल वाटते तर काय करणार
- कृपाशंकर पांडे म्हणाले, युवतीसोबत मुलीसारखे नाते आहे.
- तुम्हाला अश्लील वाटत असेल तर त्याला मी काय करु ? असा उर्मट सवाल त्यांनी केला.
- तुम्हाला काय आरोप करायचे ते करा.
- गळाभेट घेऊन आम्ही कोणता गुन्हा केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...