आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Police Introduces 'Jehangiri Ghanti' In Individual Homes

संकटसमयी पोलिस अधिकार्‍यांच्या घराबाहेरील ‘जहांगीर घंटी’ वाजवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरभंगा - संकटाच्या वेळी पोलिसांची मदत मिळवण्यासाठी बिहारच्या दरभंगा विभागाने अधिकार्‍यांच्या निवासस्थानाबाहेरील जहांगीर घंटी वाजवण्याची मुभा नागरिकांना दिली आहे. दरभंगा विभागाचे नवे पोलिस महानिरीक्षक अरविंद पांडे यांची ही कल्पना असून घंटी वाजल्यानंतर अधिकार्‍यांनी अलर्ट राहण्याच्या सूचना दहा जिल्ह्यांतील अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. ही सेवा 24 तास देण्यात आली आहे.

आपत्कालीन घंटीस जहांगीर घंटी नाव देण्यात आले आहे. मोगल सम्राट जहांगिराच्या राजवाड्याबाहेर लावण्यात आलेल्या ‘इन्साफ का घंटा’च्या (न्यायाची घंटी) आधारावर हे नाव देण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी पांडे यांना जहांगीर घंटी भेट स्वरूपात मिळाली. यावरून त्यांना दरभंगा विभागात पोलिस अधिकार्‍यांच्या निवासस्थानाबाहेर घंटी बसवण्याची कल्पना सुचली. दरभंगा विभागामध्ये दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, पुर्णिया, कटिहार, किसानगंज, अरारिया, सुपौल, मधेपुरा, सहसा आदी जिल्हे येतात.

निवासस्थानाबाहेर लावलेल्या घंटीखाली जहांगिर बेल लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. संकटावेळी मदत मागण्यासाठी नागरिकांना सकाळ उजाडण्याची आवश्यकता भासू नये, तसेच जनता दरबाराआधी प्रश्न सोडवला जावा यासाठी ही सोय उपलब्ध केल्याचे पांडे यांनी सांगितले.