आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला Porn Video दाखवून बलात्‍कार करणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार राजवल्लभ प्रसाद - Divya Marathi
आमदार राजवल्लभ प्रसाद
पाटणा - बलात्‍काराच्‍या आरोपात अडकलेले राजद आमदार राजवल्लभ प्रसाद यांच्‍या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्‍यान, शनिवारी उपमहानिरीक्षकांनी प्रसाद यांना अटक करण्‍याचे आदेश दिले. पीडित मुलीने आरोपी आमदार प्रसाद यांना ओळखल्‍यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्‍यानंतर आमदार फरार झाले. ही घटना नालंदा जिल्‍ह्यातील गिरियक बाजार येथील आहे. दरम्‍यान, आरजेडीने आमदार राजवल्‍लभ प्रसाद यांची पक्षातून हकालपट्टी केली.
आमदारावर काय आहेत आरोप....
- 6 फेब्रुवारीला बर्थडे पार्टीच्‍या नावावर एक महिला तिच्‍या शेजारच्‍या मुलीला सोबत घेऊन गेली होती.
- महिलेने या मुलीला आमदाराकडे सोपवले, अशी माहिती समोर आली आहे.
- पीडित मुलगी रात्रभर आमदाराकडे होती. आमदाराने या मुलीवर बलात्‍कार केल्‍याचा आरोप आहे.
- त्‍यानंतर त्‍या महिलेला आमदाराकडून 30 हजार रूपये मिळाले.
- बलात्‍काराच्‍या वेळी महिलेने मुलीचा एमएमएसही बनवला.
- आरोपी महिला सुलेखावर सेक्‍स रॅकेट चालवत असल्‍याचा आरोप आहे.

मुलीला दिली जीवे मारण्‍याची धमकी....
- महिलेने पीडित मुलीला जीवे मारण्‍याची धमकी दिली होती.
- तोंड उघडले तर, एमएमएस व्‍हायरल करेल असेही ती म्‍हणाली होती.
- या 15 वर्षीय पीडित मुलीने 8 फेब्रुवारीला पोलिस स्‍टेशन गाठले.
-पीडित मुलगी नगर पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत दोन मोठ्या बहिणी नी एका भावासह भाड्याच्‍या घरात राहते.
- पीडित मुलगी इयत्‍ता दहावीमध्‍ये आहे.
आत सुरू होता अत्‍याचार, बाहेर उभे होते रखवालदार....
- पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, घरात माझ्यावर अत्‍याचार सुरू असताना आत आणखी एक जण होता.
- यावेळी घराच्‍या बाहेर चार रखवालदार उभे होते.
- ती महिला बलात्‍कार करणा-याला नेताजी नावाने बोलत होती.
- मुलीने पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा रखवालदारांनी तिला अडवले.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा फोटो....