आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : फौजदाराची गोळ्या झाडून हत्या, सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन आरोपी पसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत फौजदार सुरेश ठाकूर - Divya Marathi
मृत फौजदार सुरेश ठाकूर
पाटणा - सोमवारी झालेल्या दोन घटनांनी बिहारमध्ये कायद सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्या घटनेत आरोपींनी एका फौजदाराची हत्या केली तर, दुसऱ्या घटनेत छपरा कोर्ट परिसरात खुशबु नावाच्या महिलेने बॉम्बस्फोट घडविला.

बाइकस्वारांनी झाडल्या गोळ्या
- मिळालेल्या माहितीनुसार, मोकामाचे फौजदार सुरेश कुमार ठाकूर कोर्टात आले होते.
- ते कोर्टातून बाहेर पडत असताना बाइकस्वार दोघा-तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- फौजदार ठाकूर यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर देखील बेपत्ता आहे. मृतदेहाजवळ फक्त बाइक होती.
- ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.
- 50 वर्षीय सुरेश ठाकूर सुटीवर होते, ते आजच सुटीवरुन परत आले होते आणि त्यांची हत्या करण्यात आली.

कोर्ट परिसरात महिलेने घडविला स्फोट
- बिहारच्या छपरा कोर्ट परिसरात सोमवारी सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान स्फोट झाला.
- या स्फोटात दोन महिलांसह सहा जण जखमी झाले.
- तिहार हत्या कांडातील मुख्य साक्षीदार शशी भुषणवरील हा हल्ला होता. त्यासाठी एक महिला कोर्ट परिसरात बॉम्ब घेऊन आली होती. हल्ल्या आधीच बॉम्बचा स्फोट झाला.
- आरोपी महिला शशी भुषणची चुलत बहिण आहे. याआधीही दोनवेळा तिने हल्ल्याचा प्रयत्न केला होता.
पुढील स्लाइडमध्ये, संबंधित फोटो
बातम्या आणखी आहेत...