आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bihar State Minister Bhim Singh Controversial Comment On Martyr

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस आणि जवान शहीद होण्यासाठीच असतात; बिहारच्या मंत्र्याची मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- पोलिस आणि लष्करातील जवान शहीद होण्यासाठीच असतात, असे वादग्रस्त वक्तव्य करून बिहारचे ग्रामविकासमंत्री भीमसिंह यांनी आज (गुरुवार) नवीन वादाला तोंड फोडले. परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर भीमसिंह यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफीही मागितली.

दरम्यान, पूंछमध्ये पाकि‍स्‍तानी जवानांनी केलेल्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले होते. त्यात चार बिहारमधील तर एक महाराष्‍ट्रातील जवानाचा समावेश आहे. त्यांच्यावर आज (गुरुवार) शासकीय इतमामात अंत्यसंस्‍कार करण्यात आले. परंतु बिहारमधील लोकप्रतिनिधींनी या घटनेची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे राज्यातील जनतेत संताप व्यक्त होत असताना राज्याचे ग्रामविकास मंत्री भीमसिंह यांनी आगीत तेल टाकण्याचे काम केले. पोलिस आणि जवान शहीद होण्यासाठीच लष्कारात भरती होतात, असे वादग्रस्त वक्तव्य भीमसिंह यांनी केले. त्यामुळे तर जनतेच्या भावना आणखीच बिघडल्या आहे.

बि‍हारमधील छपरा येथे शहीद प्रेमनाथ आणि मनेर येथे शहीद वि‍जय यांचे अंत्यसंस्कार करण्‍यात आले. शहीद जवानांच्या अंत्ययात्रेत लोक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. परंतु ब‍िहारमधील एकही मंत्री उपस्थित नव्हता. यावेळी भीमसिंह हे देखील उपस्थित नव्हते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भीमसिंह यांनी प्रतिक्रिया दिली होती.