आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार टॉपर घोटाळा: रुबी रॉयच्या चार उत्तरपत्रिका विषय तज्ज्ञांनीच लिहिल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील१२ वीच्या परीक्षेत बोर्डात सर्वप्रथम आलेली आरोपी आणि बनावट कला विभागातील टॉपर रुबी रॉयने तिच्या उत्तरपत्रिका स्वत: दिल्याच नाहीत. तिने फक्त होम सायन्सचा पेपर दिला होता, असे न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालामुळे उघड झाल्याची माहिती तेथील जिल्हा पोलिस उपअधीक्षक मनू महाराज यांनी दिली. रुबी रॉयच्या उत्तरपत्रिकांचे हस्ताक्षर तिच्या गृहपाठातील हस्ताक्षराशी जुळत नाही. विशेष पोलिस तपास पथकाकडून न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा हा अहवाल बोर्डाला आणि न्यायालयात सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विशुन रॉय कॉलेजमधील रुबी रॉय या विद्यार्थिनीने एका मुलाखतीत राज्यशास्त्राचा उल्लेख होम सायन्स असा करून त्यात भोजन कसे बनवतात हे शिकवले जाते, असे म्हटले. यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि बिहारमधील गुणवाढ घोटाळा गाजला होता.

या गुणवाढ घोटाळ्याचा मुख्य सूूत्रधार लालकेश्वर प्रसाद, त्याची पत्नी माजी आमदार उषा सिन्हा, व्हीआर कॉलेजचे प्राचार्य बच्चा रॉय यासह अनेक आरोपी तुरुंगात आहेत. तर रुबी रॉयला जामीन मिळाला आहे.

अशी होत असे बनावट उत्तरपत्रिका
रुबीरॉयचे परीक्षा केंद्र जीए इंटर कॉलेज वैशाली होते. येथून उत्तरपत्रिका स्ट्राँगरूममध्ये गेल्या. बच्चा रॉयने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने स्ट्राँगरूममधील उत्तरपत्रिकांचा गठ्ठा गायब करून त्याच्या कॉलेजमध्ये मागवला. त्यानंतर बच्चा रॉयच्या कॉलेजात दुसऱ्यांदा उत्तरपत्रिका लिहिण्यात आली. ती स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली. मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिकांची तपासणी केल्यानंतर दुसऱ्यांदा त्या उत्तरपत्रिका तो पाहत असे. त्यावर तो वाट्टेल तसे गुण देत असे.

न्यायवैद्यक प्रयोग शाळेमुळे घोटाळा उघड
उत्तरपत्रिकेतील गुणांत फेरबदल करण्यात आले आहेत. रुबी रॉयच्या उत्तरपत्रिकेत आधीचे गुण बच्चा रॉय यांच्या सांगण्यावर वाढवण्यात आले. प्रत्येक विषयात दिलेल्या गुणांमध्ये खाडाखोड केलेली आढळली. सूत्रांच्या माहितीनुसार बच्चा रॉयने तपासलेली उत्तरपत्रिका पाहिली होती. नंतर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ते गुणांची वाढ केली. एकूण सहा विषयाच्या उत्तरपत्रिकांपैकी केवळ दोन विषयांची उत्तरपत्रिका या मूळ उत्तरपत्रिका आहेत. इतर उत्तरपत्रिका बच्चा रॉय यांनी बदलल्या होत्या. बच्चा रॉयच्या कॉलेजातील या उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहिण्यात आली. मूळ उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पानावर वॉटर मार्क असतो, तर रुबी रॉयच्या उत्तरपत्रिकेवर वॉटर मार्क दिसत नाही.

टेंडर घोटाळ्याशी धागे
हा घोटाळा उघड झाल्यानंतर टेंडर घोटाळ्याला नवे वळण मिळेल. लालकेश्वर आणि बच्चा रॉय यांच्या इशाऱ्यावरूनच बनावट उत्तरपत्रिका छापल्या जात होत्या. जिल्हा पोलिस उपअधीक्षकांनी सांगितले की, बनावट उत्तरपत्रिकांचा वापर बच्चा रॉय मोठ्या प्रमाणावर करत असे. निकालात गैरप्रकार घडवून आणण्यासाठी उत्तरपत्रिका अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे आणि शाळेत पाठवल्या जात होत्या.
बातम्या आणखी आहेत...