आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Topper Scam: I Never Know How I Topped, Says 12th Class \'Topper\' Ruby Rai

सर, 2nd डिव्हिजनमध्ये तरी पास करा हो, रुबीची भावनिक कबुली ऐकून अधिकारी स्तब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा -बिहार टॉपर घोटाळाप्रकरणी एसआयटीने अटक केलेली कला शाखेची कथित टॉपर विद्यार्थिनी रुबी रॉय अचानक भावूक झाली. एसआयटीच्या अधिकाऱ्यांना तिने रडत रडतच साकडे घातले, “सर, किमान सेकंड डिव्हिजनमध्ये तरी पास करा हो... मला फर्स्ट डिव्हिजन नको आहे. मी परीक्षा दिलेली आहे. रोज सेंटरवर जात होते; पण आता नापास व्हावे लागल्याचे दु:ख आहे.’ तिची भावनिक कबुली ऐकून अधिकारीही स्तब्ध झाले.

राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयातून गेल्या आठवड्यात रुबीला अटक केली. त्यानंतर तिची चौकशी करण्यात येत आहे. िवशेष चौकशी पथकातील अधिकाऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा रुबीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. ती म्हणाली, मी कधीकधीच कॉलेजला जात होते; परंतु मी इंटरची परीक्षा दिली आहे. या दरम्यान एसआयटी अधिकाऱ्यांनी िवचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तिने या टॉपर गेममधून तिच्यासह तिच्या पालकांचाही बचाव केला. आम्ही सगळे िनर्दोष असल्याचा तिचा दावा आहे. काही प्रश्नांची उत्तरे देताना रुबी कावरीबावरी झाली; परंतु नंतर सफाईदारपणे ती मला काहीच माहीत नाही, असेही सांगत होती.

रुबी म्हणाली की, “बच्चा रायनेच मला टॉपर बनवले आहे. वडील बच्चा रायला भेटत असत; परंतु ते मला टॉपर करू इच्छित नव्हते. त्याबाबत त्यांच्यात कधी बोलणेदेखील झाले नव्हते. परंतु परीक्षेच्या वेळी वडिलांनी माझ्याकडे लक्ष ठेवण्यासाठी बच्चा रायला सांगितले होते. तर त्याने मला टॉपर बनवून माझा “निकाल’च लावून टाकला.’ तो आमचा नातेवाईक नाही, अशी कबुलीही तिने दिली. न्यायालयाकडून वॉरंट जारी झाल्यानंतर रुबीला अटक करून गांधी मैदान पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तेथे तिची चौकशी करण्यात येत आहे. सोमवारी दुपारी तिला नियमित सुनावणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

रायच्या कुटुंबीयांचाही शोध
याप्रकरणीएसआयटीचे प्रमुख मनु महाराज यांनी सांगितले की, विशून राय शैक्षणिक संस्थेशी संबंधित बच्चा रायचे वडील, भाऊ, पत्नीसह इतर अनेक आरोपींचा शोध सुरू आहे. त्यासाठी अनेक संभाव्य िठकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या टॉपर घोटाळ्यातून आरोपींनी कमाई केलेल्या काळ्या पैशाचाही शोध घेतला जात आहे.

उपसचिवासह तीन कर्मचारी संशयित
बिहारविद्यालय परीक्षा समितीमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणाशी संबंधित उपसचिव कामेश्वर प्रसाद गुप्तासह तीन कर्मचारी एसआयटीच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यात टॅब्युलेशनर गुण फायलिंगचे काम करणाऱ्या दोघांचा समावेश आहे. बोर्डाच्या कार्यालयात या तिघांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. परीक्षा पद्धती, िनकालातील घोळ इतर प्रकारांची त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. उपसचिव कामेश्वर गुप्तासह इतरांच्या भोवती आगामी काळात कायदेशीर फास आवळला जाऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे टॉपर घोटाळ्यात तपास पथकाच्या सहकार्यासाठी कामेश्वर प्रसादलाच नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले होते.

बिट्स पिलानीमध्ये टॉपरचा प्रवेश होण्याची शक्यता नाही
बिट्स पिलानी (बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) संस्थेत या वर्षी बिहारच्या टॉपरचा (सायन्स) प्रवेश होण्याची शक्यता नाही. इंटर टॉपर घोटाळ्यामुळे सर्वच निकाल चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. बोर्ड प्रशासन त्याच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे टॉपरची अंतिम यादीदेखील बोर्ड अद्याप जाहीर करू शकलेले नाही. बोर्ड प्रशासनाने म्हटले आहे की, टॉपर्सची यादी आताच जाहीर केली जाऊ शकत नाही. इंटर सायन्स, आर्ट््सच्या पहिल्या पाच टॉपर्सच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यात सायन्सचा टॉपर लोकचंद्र अंशुमन मसकाराचाही समावेश आहे; परंतु अजून अक्षरांची चाचणी त्याचा अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतर ही यादी अंतिम होईल.

पुढील स्लाइडवर वाचा...
> या टॉपर्सना विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली गमतीशीर उत्तरे
>रिव्ह्यू टेस्टनंतर टॉपर रुबी रॉयचा निकाल ठरवला रद्द...
>'टॉपर' रुबीला सोप्या-सोप्या प्रश्नांचीही उत्तरे देता अाली नाही...

> अखेरच्या स्लाइड्सवर पाहा या टॉपर्सचा व्हिडीओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...