आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टरमाइंड लालकेश्वर पत्नी उषासह जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार शालेय परीक्षा मंडळाचे माजी अध्यक्ष लालकेश्वर प्रसाद सिंह आणि त्यांची पत्नी तथा संयुक्त जनता दलाच्या माजी आमदार उषा सिन्हा यांना सोमवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अटक करण्यात आली. सिंह हे बिहारमधील इंटर टॉपर्स घोटाळ्यातील कथित मास्टरमाइंड असल्याचे म्हटले जाते.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले की, लालकेश्वर सिंह आणि त्यांची पत्नी उषा हे दोघे वाराणसीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांना अटक केली. याबाबतची अधिक माहिती नंतर दिली जाईल.

उषा सिन्हा या घोटाळ्यातील सह-आरोपी आहेत. बिहार पोलिसांनी लालकेश्वर आणि उषा सिन्हा यांच्याविरोधात पाटणा न्यायालयातून अटक वॉरंट मिळवल्यानंतर हे दोघे बेपत्ता झाले होते. त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश होते. एसआयटी सोमवारीच ही कारवाई करणार होती. त्यांना शोधण्यासाठी झारखंडमध्येही छापे टाकले होते.

पाटणा येथील गंगा देवी महाविद्यालयातून मोठी रक्कम घेऊन विद्यार्थ्यांना पदवी वाटली जात असे. उषा सिन्हा या महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आले होते.

या घोटाळा प्रकरणात वैशाली येथील बिष्णू राय इंटरमिजिएट कॉलेजचा सचिव आणि प्राचार्य बच्चा राय याला याधीच अटक करण्यात आली आहे. लालकेश्वर सिंह आणि त्यांची पत्नी उषा हे दोघे पदवीचे रॅकेट कसे चालवत होते याची माहिती त्याने दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बच्चा रायला गेल्या आठवड्यात महाविद्यालयाबाहेर अटक झाली होती. पोलिसांनी त्याच्या महाविद्यालयात तसेच वैशालीतील त्याच्या घरी छापे टाकून या घोटाळ्यातील अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
बच्चा रायच्या घरात २० किलो दागिने : या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी बच्चा रायच्या घरी पोलिसांनी छापा टाकला त्या वेळी त्याच्या घरात २० किलो सोन्याचे दागिने आढळले. हे सोने गवताच्या गंजीत दडवून ठेवलेले होते.

अशी झाली अटक
हे दांपत्य वाराणसीत दडून बसलेले असल्याची माहिती पोलिसांना चार दिवसांपूर्वीच मिळाली होती. पण तो भाग एवढा दाट लोकसंख्येचा आहे की तेथे मोबाइल टॉवर लोकेशनच्या आधारावर पथक तेथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. हे दांपत्य हे घर सोडून दुसरीकडे गेल्याची माहिती सोमवारी सकाळी मिळाली. साध्या वेशातील जवानांनी त्यांना लगेच अटक केली.
बातम्या आणखी आहेत...