आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार सेमीफायनल LIVE: नितीश-लालू यांना NDA ठरले वरचढ, 9 जागांवर आघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या विधान परिषदेची आज (शुक्रवार) मतमोजणी सुरु आहे. 24 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आघाडीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहे. एनडीएला 11 जागांवर पुढे आहे तर जेडीयू-आरजेडी सात जागांवर आघाडीवर आहे.
एनडीएला लॉटरी
भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला 11 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यातील औरंगाबाद, गोपालगंज, छपरा, कैमूर, दरभंगा, समस्तीपुर, सीवान आणि पूर्णिया या सात मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला एक जागा मिळाली आहे. कटिहार येथील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक अग्रवाल देखील विजयी झाले आहेत.
जेडीयू-आरजेडी पिछाडीवर
जेडीयूला तीन जागांवर (मुजफ्फरपुर, गया आणि नालंदा) यश मिळाले आहे तर, दोन जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे आरजेडीने वैशाली येऊन विजय मिळविला असून आरा येथे आघाडीवर आहे.