आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar's 'Osama' To Contest Against Modi From Varanasi

वाराणसीत मोदींविरुद्ध ओसामाही मैदानात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन अशी ओळख असलेल्या मीर खालिद नूर यांनी वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा शुक्रवारी केली.

बिहारमध्ये नूर यांची ‘ओसामा’ म्हणून ओळख आहे. राम इंडिया या नवीन पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वाराणसीमधून मोदी यांच्या विरोधात मला निवडणूक लढवायची इच्छा होती. खूप विचार केल्यानंतर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे नूर यांनी सांगितले. व्यवसायामधून राजकारणाकडे वळलेले नूर म्हणाले की, ‘लालू प्रसाद यादव व राम विलास पासवान यांनी मुस्लिम मतांसाठी माझा अनेकदा उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे स्वत: निवडणूक लढविण्याचा विचार केला’. नूर यांना क्रीडा क्षेत्राची विशेष आवड आहे. कराटेमध्ये त्यांनी विविध पदके मिळवली आहेत.