आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नामवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध सोनपूर बाजारावर नोटबंदीचे सावट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाजीपूर - बिहारच्या सोनपूरमध्ये जनावरांचा बाजार संपूर्ण आशियात प्रसिद्ध आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या बाजारात काही जनावरे विक्रीसाठी आणली जातात, तर काही फक्त प्रदर्शनासाठी अाणली जातात.

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या बाजारावर नोटबंदीचा परिणाम झालेला दिसून आला. बहुतांश जनावरांना त्यांचे मालक घरी परत घेऊन गेले. त्यापैकीच १२ लाख रुपये किमतीचा अरबी जातीचा हा घोडा असून याचे नाव राजा आहे. राजाला तीन वर्षांपासून या बाजाराची शान म्हणून ओळखले जाते. पाटण्यातील चांदमारीचा राजा धीरेंद्र गोप यांनी आपले नाव या घोड्यास दिले. अरबी जातीच्या या घोड्याला आतापर्यंत चार रेस अवॉर्ड मिळाले आहेत. त्याला खुराक म्हणून सहा लिटर दूध, २०० ग्रॅम पिस्ता- बदाम दिले जातात. याच्या मालिशसाठी दोन ट्रेनर आहेत.

राजावर दरमहा २० ते २५ हजार रुपये खर्च होतात. नोटबंदीचा परिणाम गाय, हत्तीसह विविध बाजारांवर दिसून येतो आहे. उत्तम जातीचे घोडे, कुत्रे आणि गाई आता केवळ प्रदर्शनात ठेवण्यासारख्याच उरल्या आहेत. या वेळी अडीच हजार घोडे विक्रीस आले होते. दहा ते बारा हत्ती होते. परंतु त्यांना रोख रकमेच्या अडचणीमुळे कोणी विकत घेण्यास तयार नाही. त्यामुळे जनावरांच्या बाजारात आलेल्या एजंटाची निराशाच झाली.
बातम्या आणखी आहेत...