आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंसा एक्‍झ‍िट पोलमध्‍ये NDA पुढे, ABP च्‍या सर्वेत लालूच्‍या मुलाचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यात गुरुवारी 57 जागांवर विक्रमी 60 टक्के मतदान झाले. राज्यातील सर्व 243 जागांसाठी सरासरी 56.8 टक्के मतदान झाले. मतमोजणी व निकाल 8 नोव्हेंबरला आहेत. राज्यात बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे. दरम्‍यान, विविध संस्‍था, प्रसार माध्‍यमांच्‍या तीन एक्‍झि‍ट पोलच्‍या आधारे भाजप सत्‍ता बनवेल असे दिसत असून, महायुतीला झटका बसणार आहे. यामध्‍ये एनडीएला 120 ते 130 जागा तर महागठबंधनला 105 ते 115 ठिकाणी विजय मिळतील. तसेच इतर पक्ष, अपक्ष असे 5 ते 10 मतदारसंघात बाजी मारतील, असा अंदाज तीन एक्झिट पोलमधून व्‍यक्‍त झाला तर महाघाडीचीच सत्‍ता येईल, असे पाच एक्‍झ‍िट पोलमधून दिसत आहे.
कोणी व्‍यक्‍त केला एनडीएच्‍या बाजूने अंदाज ?
संस्था-वृत्तवाहिन्यांचे निकालपूर्व सर्वेक्षण (एक्झिट पोल) जाहीर झाले. यात नितीश-लालूंच्या महायुतीला आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे . सहापैकी चार सर्व्हेंत महायुतीला स्पष्ट बहुमत वा त्याच्या जवळपास पोहोचताना दाखवले जात आहे. दोन वर्षांत अनेक अचूक एक्झिट पोल देणाऱ्या न्यूज 24 - टुडेज चाणक्यने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला तब्बल 155 जागा दाखवत इतर सर्वेक्षणांपेक्षा वेगळा निकाल वर्तवला आहे. अशाच प्रकारचाद अंदाज हंसानेही व्‍यक्‍त केला आहे. त्‍यांच्‍या अंदाजानुसार, एनडीला 120 ते 130 तर महायुतीला 105 ते 115 जागा मिळतील.
नितीशच मुख्यमंत्री : लालू
बिहारमध्ये जर आपल्या पक्षाने जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडेच राहील, असे स्पष्टीकरण राजदप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. आपला पक्ष उपमुख्यमंत्रिपद मागणार का, या प्रश्नाला मात्र लालूंनी उत्तर देणे टाळले. निवडणुकीत महायुती १९० पेक्षा जागा जिंकेल, असा अशावाद त्यांनी व्यक्त केला. निकाल आल्यानंतर सर्व बाबींवर विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
निकालाचा केंद्राशी संबंध नाही : भाजप
बिहारचा निकाल हा मोदी सरकारला इशारा नसेल. उलट ती लालू प्रसाद, नितीश व जंगल राजला चपराक असेल, असे भाजप नेते अनंतकुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार म्हणाले, एक्झिट पोल वेगळे चित्र निर्माण करत असले तरी आपण निकालांसाठी 8 नोव्हेंबरची वाट पाहायला हवी, असे ते म्हणाले.
पहिल्‍या टप्‍प्‍याततील 49 जागेपैकी महायुतीला 28 जागा
पहिल्‍या टप्‍प्‍यात 49 जागेसाठी मतदान झाले. या ठिकाणी ओबीसी वोटर्स अधिक असून, मुस्लिम कमी आहेत. दरम्‍यान, दलितांची संख्‍याही ब-यापैकी आहे.
एक्झिट पोलनुसार, या ठिकाणी महाआघाडीला 43% मतं एनडीएला 39% मतं मिळतील. तसेच येथे महायुतीला 28 तर एनडीएला 20 मतदारसंघात विजय मिळेल.
दुस-या टप्‍प्‍यांतील 32 जागेपैकी एनडीएला 19
बिहारच्‍या भोजपूर परिसरामध्‍ये सेकंड फेजमध्‍ये मतदान झालेल्‍या 32 मतदार संघात ओबीसी आणि मुस्लिम वोटर्सची संख्या अधिक आहे. एक्‍झ‍िट पोलनुसार, 32 पैकी एनडीएला 19, महायुतीला 12 तर इतर एक असा अंदाज आहे.
तिस-या टप्‍प्‍यातील 50 पैकी एनडीए 28 जागा
तिस-या टप्‍प्‍यातील 50 जागांसाठी मतदान झाले असून, बहुतांश मतदारसंघ शहरी भागातील होते. या परिसरातील भाजपचा गड मानतात. या ठिकाणी एनडीएला 28 तर महायुतीला 21 जागा मिळतील.
चौथ्‍या टप्‍प्‍यांत भाजपला 31 जागा
तिरहुत प्रांतातील 55 मतदार संघात चौथ्‍या टप्‍प्‍याचे मतदान झाले. येथे दलित आणि मुस्‍लीम मतदारांची संख्‍या अधिक आहे. येथे महायुतीला 21तर एनडीएला 31 जागा मिळतील.
पाचव्‍या टप्‍प्‍यात महायुतीला 28 जागा
एक्‍झ‍िट पोलनुसार शेवटच्‍य आणि पाचव्‍या टप्‍प्‍यातील 57 जागांपैकी एनडीएला 27 तर महायुतीला 28 जागा मिळतील. महायुतीमध्‍ये जेडीयू, आरजेडी आणि कॉंग्रेस सहभागी आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, लालूंच्‍या मुलाचा पराभव होणार, एबीपीचा अंदाज..