आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biihar MP Punjab Karnataka Bye Election News In Marathi

लालू नितीशमुळे मोदी लाट मंदावली, बिहारमध्ये १० पैकी ६ जागांवर राजद-जदयू-काँग्रेस विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा | नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांत सगळीकडे मोदी लाटच वरचढ सिद्ध झाली. या लाटेची पहिली चाचणी राज्यांतील निवडणुकांच्या रूपात घेतली गेली. या चाचणीचे िनकाल समोर आले आहेत. ४ राज्यांत १८ विधानसभा जागांसाठी पोट निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांदरम्यान सर्वांची नजर बिहारच्या निकालांवर होती. येथे १० जागांसाठी मतदान घेण्यात आले. २० वर्षांनंतर लालू- नितीश युतीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. हा प्रयोग यशस्वी ठरला. ही जोडी मोदी लाटेला खीळ घालण्यात यशस्वी ठरली.

राजद-जदयू-काँग्रेस या युतीने बिहारात ६विधानसभा जागांवर विजय मिळवला आहे. यात २ भाजपच्या जागा घेण्यात युती यशस्वी ठरली. पोट निवडणुकांत लालू नितीश जोडीने मौहोलच बदलून टाकला आहे. कर्नाटकातील ३ पैकी २ जागांवर काँग्रेसनेविजय मिळवला आहे. भाजपला १ जागेवर समाधान मानावे लागले. बेल्लारी ही बहुचर्चित जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे. येथील भाजपचे पूर्व आमदार के.बी. श्रीरामुलू यांनी खासदारकी जिंकल्यामुळे रीती झाली होती. मध्य प्रदेशातील ३ पैकी पूर्वी २ जागा भाजपच्या तर १ काँग्रेसची होती.

पोटनिवडणुकांत दोन्ही पक्षांनी परस्परांच्या एका जागेचे नुकसान केले आहे. पंजाबात मात्र काँग्रेसचे नुकसान झाले आहे. ज्या २ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या त्या दोन्ही पूर्वी काँग्रेसच्या होत्या. यातील एक जागा अकाली दलाने जिंकली आहे.

निकालांचा अन्वयार्थ
>लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागांवर भाजपला आघाडी होती. मात्र आता ती घटून ४ जागांवर आली आहे. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे यापैकी ६
जागा होत्या.

>महायुतीचा प्रयोग यशस्वी राहिला. मात्र ४५% मते मिळवण्याचा दावा फोल ठरला. असे झाले असते तर भाजपला एकही जागा मिळाली नसती.

>२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा फाॅर्म्यूला पुन्हा आजमावला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या एकतर्फी कामगिरीमुळे निराश कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल.

>राजदने चार जागा लढवत तीन ठिकाणी विजय मिळवला. महायुतीत लालूंची मोठ्या भावाची भूिमका निभवण्याची इच्छा असेल. अशात नितीश यांच्यासोबत त्यांचे वाद होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.