आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bike Came Infront Of Plane At Take Off In Bilaspur

"टेक अाॅफ'च्याच वेळी विमानासमाेर बाइक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर (छत्तीसगड) - छत्तीसगड विधानसभा अध्यक्ष गाैरीशंकर अग्रवाल अाणि भाजप प्रदेशाध्यक्ष धरमलाल काैशिक यांना घेऊन चकरभाठा विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानासमाेर अचानकपणे गाणे एेकण्यात गुंग हाेऊन दुचाकीवरून निघालेला तरुण अाल्याने क्षणभर सर्वांच्याच काळजाचा ठाेका चुकला. पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानाने एक बांका प्रसंग चुकला.
राज्याचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांच्या ज्येष्ठ बंधूंचे २५ एप्रिल राेजी अपघाती निधन झाले. अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी विधानसभा अध्यक्ष गाैरीशंकर अग्रवाल शासकीय विमानाने २६ एप्रिल राेजी सकाळी रायपूरच्या विमानतळावरून जशपूरच्या दिशेने निघाले हाेते. सकाळी चकरभाठा विमानतळाच्या धावपट्टीवरून माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष धरमलाल काैशिक यांनाही साेबत घ्यायचे हाेते. त्यानुसार चकरभाठा विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष धरमलाल काैशिक यांना तेथून घेतल्यानंतर विमान टॅक्सी रन-वे वरून मुख्य रन-वे स्टेशन एंडवर पाेहाेचले. तेथून विमानाने गती घेतली अाणि टेक अाॅफ घेण्याच्या दिशेने धावले. तेवढ्यात समाेर बाईकस्वार अाला. ताे धडकणार इतक्यात पायलटने प्रसंगावधान राखून विमानाचे उड्डाण केले.

अचानक झटका का लागला, याबाबत सर्वच अनभिज्ञ
विमानाला जवळपास २०० मीटर धावपट्टीवर धावणे अावश्यक हाेते. परंतु, क्राॅसिंगवर पाेहाेचण्यापूर्वीच पायलटला विमानाला टेक अाॅफ करावे लागले. अचानक टेक अाॅफचा अाभास घडल्याने विमानातील दिग्गजांना झटका तेवढा बसला. या झटक्यामागचे कारण नंतर पायलटने विधानसभा अध्यक्षांना सांगितले.