आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: ६० फूट टॉवरवर बाइक अडकली, २० फुटांवरुन तरुण खाली पडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बतौली/अंबिकापूर (छत्तीसगड)- हे छायाचित्र छत्तीसगडमधील बतौलीचे आहे. तेथे सोमवारी पोलवर हायटेन्शन तार चढवण्यात येत होती. ट्रॅक्टरने मजूर तार ओढत होते. त्या वेळी तेथून जात असलेला राजेश नावाचा युवक बाइक थांबवून ते पाहत होता. धोका पाहून मजुरांनी त्याला बाजूला जायला सांगितले. राजेश तारेवरूनच बाइक घेऊन जाऊ लागला. तेव्हा त्याची बाइक तारेत अडकली. परंतु ट्रॅक्टरचालकाला ते दिसले नाही आणि त्याने वेगाने ट्रॅक्टर चालवले. पाहता पाहता राजेश बाइकसह २० फूट वर उचलला गेला. तेथून तो खाली पडला. पण त्याची बाइक ६० फूट उंचीवर जाऊन लटकली. नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी महत्प्रयासाने बाइक खाली उतरवली. राजेशला गंभीर दुखापत झाली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या विचित्र घटनेची छायाचित्रे