आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पाण्यावरही चालेल बाईक, एक लीटरमध्ये मिळणार 250 KM चा अॅव्हरेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - किटचे प्रात्याक्षिक दाखवताना नित्य.
चंदिगड - पेट्रोलचे दाम कमी होत असले तरी जर आपल्याला बाइकसाठी पेट्रोलची गरजच भासली नाही आणि बाइक पाण्यावरच धावली तर किती चांगले होईल. हे ऐकायला शक्य वाटत नसले तरी एका दहावीच्या विद्यार्थ्याने हे शक्य करून दाखवले आहे. गव्हर्नमेंटल मॉडेल स्कूल सेक्टर-22 शाळेतील नित्याशीष याने बाइकसाठी अशा प्रकारची किट तयार केली आहे. 42 व्या स्टेट लेव्हल एक्झिबिशनमध्ये त्याने या बाइकची किट सादर केली.

नित्य याने दिलेल्या माहितीनुसार आपल्या रोजच्या वापरातील बाइकवरच त्याने एक किट फीट केली आहे. त्यात पाणी टाकल्यास ते एचएचओ सेलमध्ये जाईल. त्याठिकाणी इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर ऑक्सीजन गॅस तयार होतो. त्याद्वारे गॅस इंजिन ऑपरेट होते. इतर बाइकमुळे जसा धूर तयार होतो. त्याउलट या बाइकमधून पाणी निघेल आणि ते सायलेंसरमधून बाहेर येईल.
त्यामुळे प्रदूषणही कमी करता येऊ शकेल. ही किट तयार करण्यासाठी नित्यला केवळ 1900 रुपये आणि तीन आठवड्यांचा कालावधी लागला. या बाईकचा वेग ताशी 50 किलोमीटरपर्यंत आहे. या किटमध्ये जर 2 लीटर क्षारयुक्त पाणी टाकले तर बाइक 500 लीटरपर्यंत चालते. तर 2 लीटर डिस्ट्रल वाटर टाकल्यास बाइक 200 किलोमीटरपर्यंत चालते. किटमधील पाणी संपल्यास तुम्हाला केवळ पाणी बदलावे लागेल. किटमध्ये 2 लीटरपेक्षा अधिक पाणी बसू शकत नाही.
नित्यने यापूर्वी सोलर एअर कंडीशन तयार केले होते. त्याची राज्य पातळीवर पहिल्या पाचमध्ये निवड झाली होती. तर राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक पटकावला होता.
एनसीईआरटीच्या सहकार्याने स्टेट कौंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेक्टर-32 मध्ये बुधवारी 42 व्या स्टेट लेव्हल सायन्स, मॅथ अँड अनव्हायरमेंट प्रदर्शन 2015 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात नित्यनेही ही बाइक सादर केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर काही Photo