आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर भयावह दृष्य, अपघातानंतर शीर वेगळे होऊन 10 मिनिट तडफडत राहिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाथद्वारा (राजस्थान) - रोजच्या प्रमाणे ड्यूटीवर निघालेल्या बाइकस्वाराला मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या जोरदार धडकेने बाइकस्वाराचे शीर धडावेगळे झाले. घटनास्थळीच त्याची प्राणज्योत मालवली. स्थानिकांच्या माहितीनुसार, वेगळे झालेले शीर 10 मिनिटांपर्यंत तडफडत होते. लोकांनी 108 क्रमांक डायल करुन अॅम्ब्युलन्स बोलावली मात्र त्यांनी मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे एकतास मृतदेह रस्त्यावर पडून होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडियाणा रेल्वेस्टेशन परिसरात राहाणारे तेजसिह (40) सकाळी आठ वाजता बाइकवर ड्यूटीसाठी निघाले होते.

- साडे आठ वाजता सिंहाड तलावा नजीक मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
- धडक बसताच ते बाइकवरुन खाली पडले आणि ट्रक त्यांच्या मानेवरुन गेला, यामुळे तेजसिंह यांचे शीर धडावेगळे झाले.
- घटनास्थळीच तेजसिंह याचा मृत्यू झाला. अपघातानंत ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून ड्रायव्हरचा शोध सुरु आहे.
- तेजसिंह 10 दिवसांपूर्वीच एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला लागले होते.
तेजसिंह यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले
- तेजसिंह यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. मोठा मुलगा 14 तर दुसरा नऊ वर्षांचा आहे.
- दीड वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचे निधन झाले होते. तिच्या पतीचेही निधन झाले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, मृतदेह का नेले नाही 108 अॅम्ब्युलन्सने