आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लेडी ऑफ हार्ले\'ने वीनूने पतीला घटस्फोट देऊन सुरु केला होता स्वत:चा बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीनू - Divya Marathi
वीनू
जयपूर- 'लेडी ऑफ हार्ले' नावाने प्रसिद्ध असलेली बाइक रायडर वीनू पालीवाल आयुष्याची 'रेस' अंतिम टप्प्यात हरली. मध्यप्रदेशातील विदिशाजवळ सोमवारी वीनूचे अपघाती निधन झाले. मंगळवारी रात्री उशीरा मानसरोवर (जयपूर) येथे वीनूचे पार्थिव आणले. बुधवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

पतीला दिला होता घटस्फोट...
-वीनूचा विवाह दिल्लीतील बिझनेसमन एच. विक्रम यांच्यासोबत झाला होता.
- वीनूला एक मुलगी व मुलगा असून दोघे लंडनमध्ये ‍शिक्षण घेत आहेत.
- दोन वर्षांपूर्वी वीनूचा घटस्फोट झाला होता. नंतर ती जयपूरमध्ये स्थायिक झाली होती.
- वीनूला बाइक चालवण्याची प्रचंड आवड होती. पतीकडे ती नेहमी बाइक चलवण्याची इच्छा व्यक्त करत असे.
- 'एका बिझनेसमनची पत्नी असून बाइक चालवशील तर समाज काय म्हणेल?', अशा शब्दात एच.विक्रम यांनी वीनूला रागवले होते. यावरुन दोघांमधील वाद वाढतच गेला. परिणामी त्यांच्यात काडीमोड झाला.

दोन रेस्तरॉंची मालकीन होती वीनू...
-वीनू दोन रेस्तरॉंची मालकीन होती.
- जयपूरमध्ये तिने रेस्तरॉं आहेत.
- तसेच ती महिलांसाठी एक ग्रुपही चालवत होती. महिलांमध्ये जनजागृती करण्‍याचे काम या ग्रुपच्या माध्यमातून केले जात होते.

काय म्हणाले वीनूचे वडील?
- वीनूचे वडील के.एल.पालीवाल यांनी सांगितले की, वीनूचा जन्म नैनीतालमधील पंतनगरमध्ये झाला होता.
- के.एल.पालीवाल बॅंकेत नोकरीला होते. ते मूळ मथुराचे आहेत.
- वीनू घरात मोठी होती. त्यामुळे तिचे खूप लाड झाले.
- छोटी बहीणीची तिने खूप काळजी घेतली होती.
- तिला 'पुत्रिका' या नावाने हाक मारत. 'पुत्रिका'चा अर्थ असा की, त्यात 'पुत्र' व 'पुत्री' (मुलगा-मुलगी) असे दोन्ही गुण असतात.
- वीनूच्या वडिलांची लखनौमध्ये बदली झाली होती. लोरेंटो स्कूलमध्ये वीनूला अॅडमिशन मिळाले होते.
- लोरेंटो स्कूलमध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आरयूमधून पोस्ट ग्रॅज्युएशन, लंडनमधील मॅनचेस्टर मॅनेजमेंट स्कूलमधून एमबीए केले.
- वीनू राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन चॅम्पियन होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'लेडी ऑफ हार्ले' वीनूचे फोटोज...