रांची (झारखंड) - रांची एअरपोर्टवर शनिवारी एअर एशियाची फ्लाइट-15541 मोठ्या अपघातातून बचावली. सकाळी 9.40 वाजता विमान रनवेवरून टेकऑफ करण्याच्या प्रयत्नात असताना एका पक्ष्याने धडक दिली. पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून विमानाला जमिनीवर उतरवले. फ्लाइट रांचीहून नवी दिल्लीला जात होती. यात 174 प्रवासी स्वार होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पक्ष्याच्या धडकेने विमानाचे ब्लेड्स तुटले...
- एअरपोर्ट सूत्रांनुसार, पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाचे ब्लेड्स तुटले आहेत. यामुळे ठिणग्याही उडताना दिसल्या. पक्ष्याच्या धडकेनंतर वैमानिकाने त्वरित निर्णय घेतला आणि विमानाला जमिनीवर उतरवले.
- या अपघातानंतर एअर एशियाने रांची रूटवरील आपली सर्व उड्डाणे दुपारपर्यंत रद्द केली होती.