आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात आहे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांचे जन्मस्थान, पाहा Photo

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : गुरुद्वारा ननकाना साहीब

अमृतसर - शीख धर्माचे प्रवर्तक गुरूनानक देव यांचा जन्म 15 एप्रिल 1469 मध्ये 'तलवंडी' येथे झाला होता. सध्या हे स्थळ पाकिस्तानात आहे. गुरूनानक यांच्या जन्मानंतर तलवंडीचे नामकरण ननकाना असे झाले. पड़ा। गुरूनानक शीख धर्माचे पहिले गुरू होते. त्यांच्यानंतर शीख धर्मात 9 गुरू झाले.

ननकाना साहीब हा शीख धर्मातील अत्यंत महत्त्वाचा गुरुद्वारा आहे. महाराजा रणजित सिंह यांनी याची निर्मिती केली होती. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कायम स्मरणात राहावे या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली होती. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर शीख भावीक याठिकाणी येत असतात. सुमारे दहा दिवस हे भावीक पाकिस्तानात राहतात आणि ननकाना साहीबमध्ये गुरुनानक यांच्या जन्मदिन सोहळ्यात सहभागी होतात.


6 नोव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देव यांची जयंती आहे. त्या निमित्ताने divyamarathi.com आपल्याला त्यांच्या जन्मस्थळाबाबत माहिती देत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ननकाना साहीबचे Photo