आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ पाडसाला स्‍तनपान करणारी आई, कुटुंबातील सदस्‍याप्रमाणे देते वागणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्‍थान - आईची ममता कशाला म्‍हणतात हे सांगणारे हे बोलके छायाचित्र आपल्‍याला नक्‍कीच आवडेल. हरीणसारखा चपळ प्राणी सहसा माणसांजवळ फिरकत नाही. मात्र, जीव वाचवणा-या आईच्‍या प्रेमाला हे अनाथ पाडस कसे भुलेल. या आईने आपल्‍या मुलाप्रमाणे या पाडसाची काळजी घेतली. स्‍तनपान करून त्‍याला वाचवले. देश- विदेशात चर्चा....

- राजस्‍थानातील बिश्र्नोई समाजाच्‍या या महिलेची चर्चा देश विदेशात होत आहे.
- 45 वर्षीय मंगी देवी या असे या अनाथ पाडसाला पाळणा-या महिलेचे नाव आहे.
- बिश्र्नोई समाजबांधव हरिणीला पवित्र मानतात. हरीण वाचवण्‍यासाठी ते काहीही करू शकतात.
- मंगी देवी पाडसाचे लाड पुरवतात. त्‍याला स्‍तनपानही करतात.
- मंगी देवी सांगतात की, "" या चिमुकल्‍या पाडसाला मी माझ्या परिवारातील सदस्याप्रमाणे वागणूक देते. त्‍याला इतर सदस्‍यांसारखाच आहारही देते. आता हे हरीण आमच्‍यात राहात असल्‍याने ते
अनाथ नाही.''
- हरियाणाला लागून असलेल्‍या राजस्‍थानच्‍या या भागात बिश्र्नोई समाजाचे 2000 हून अधिक घरं आहेत.
- मागील 600 वर्षांपासून हे लोक प्राण्‍यांची सेवा करत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, ही आई अशी घेते या पाडसाची काळजी.....
बातम्या आणखी आहेत...