आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्र्यांचे हिंदीतील पत्र न समजल्यामुळे बीजद खासदाराने उडिया भाषेत पाठवले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर व ओडिशाच्या ढेंकानाल मतदारसंघाचे बीजू जनता दलाचे  खासदार तथागत सत्पथी यांच्यातील रंजक पत्रव्यवहार समोर आला आहे. नरेंद्रसिंह तोमर यांच्या ११ ऑगस्ट रोजी पाठवलेल्या पत्रास सत्पथी यांनी १९ ऑगस्ट रोजी उडिया भाषेत उत्तर पाठवले. हे पत्र टि्वट करत सत्पथी यांनी लिहिले की, माननीय केंद्रीय मंत्र्यांनी हिंदीत काय लिहिले ते मला कळले नाही. त्यामुळे उडियात उत्तर पाठवत आहे.
 
केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायत राज व पेयजल व स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सत्पथी यांना पत्र लिहिले होते. यामध्ये न्यू इंडिया मंथन, ‘संकल्प से सिद्धी’ कार्यक्रमाचा उल्लेख करत म्हटले होते की, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा तसेच २१ ते २५ ऑगस्टदरम्यान जिल्हा परिषदेत परिषद आयोजित करण्यात आली आहे. याच पत्रात त्यांनी एका कार्यक्रमात खासदार तथागत सत्पथी यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हिंदीत लिहिलेल्या या पत्रास सत्पथी यांनी अापली मातृभाषा उडियातून उत्तर दिले.

बीजू जनता दलाचे खासदार तथागत सत्पथी यांचे उत्तर
आदरणीय श्री. नरेंद्रसिंह तोमरजी,
तुमचे  ११-८-२०१७ चे पत्र मिळाले. पत्रासाठी धन्यवाद. तुमची हिंदी समजत नाही हे खेदाने सांगावे लागत आहे. त्यामुळे मी माझ्या पत्रात काय लिहू. ओडिशा क श्रेणीतील राज्य आहे. त्यामुळे तुम्ही उडिया किंवा इंग्रजीत  पत्रव्यवहार करावा. भगवान जगन्नाथ आपले भले करो.
- तथागत सत्पथी, खासदार, ढेंकानाल, ओडिशा
 
बातम्या आणखी आहेत...