आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-एआयएडीएमके युतीविषयी तूर्तास मौनच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - एआयएडीएमकेसोबत भाजप युती करेल का, याविषयी काहीही बोलणे घाईचे ठरेल, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. तामिळनाडूमधील राजकारण जे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर मूलभूत स्वरूपात बदलण्याची शक्यता आहे. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असून युतीविषयी बोलण्याची ही योग्य वेळ नसल्याचे व्यंकय्या म्हणाले. त्यांचा अंतिम विधी सुरू असून राज्य खिन्न आहे. शिवाय राज्यात आता निवडणुकाही नसल्याने हा प्रश्नच आैचित्यपूर्ण नसल्याचे ते पत्रपरिषदेत बोलताना म्हणाले.

केंद्र आणि भाजपची तामिळनाडूमध्ये काय रणनीती असेल, याविषयी माध्यम प्रतिनिधींनी नायडूंना प्रश्न विचारले. जे. जयललिता यांच्या जाण्याने एआयएडीएमकेमध्ये तितके दमदार नेतृत्व उरले नाही. त्यांच्याइतका कणखर चेहराही राज्यात नसून आता भाजपचे धोरण काय असेल, याविषयी व्यंकय्या नायडूंनी घेतलेल्या पत्रपरिषदेत अनेक प्रश्न विचारले गेले.

भाजप एआयडीएमकेत फूट पाडेल का, या प्रश्नावर व्यंकय्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. हे प्रश्न केवळ कल्पनांच्या आधारावर विचारण्यात येत असून वास्तविकतेशी त्याचा संबंध नसल्याचे ते म्हणाले.

‘नैसर्गिक युती’ असे काही नसते
एआयएडीएमके हा भाजपचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे, असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. भाजप किंवा इतर नेत्यांनी हा शब्दच वापरलेला नाही. ही माध्यमांची भाषा आहे, राजकीय नेत्यांची नाही. राजकारणात ‘नैसर्गिक युती’ असे काही नसते. विचारांमध्ये काही अंशी समानता असेल तेव्हाच युती होते. काही बाबतीत एआयएडीएमकेचा मोदींना पाठिंबा आहे. ही युती गुंतागुंतीचा प्रश्न असल्याची भूमिका नायडूंनी मांडली.
बातम्या आणखी आहेत...