आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे \'आप\'ला आणखी 5 प्रश्न, देश विरोधी तत्वांद्वारे प्रचार करून घेतल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांमधील नव्या रणनीतीनुसार अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी मैदानात उतरलेल्या भाजपने शुक्रवारी आपला आणखी 5 प्रश्न विचारले. भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारमण यांनी हे प्रश्न मांडले. गेल्यावेळी विचारलेल्या प्रश्नांची आपने उत्तरे दिलेली नाहीत. पण जोपर्यंत आप उत्तरे देणार नाही, तोपर्यंत भाजप प्रश्न विचारत राहणार असल्याचे, सीतारमण म्हणाल्या. भाजपने कधीही डिबेटपासून पळ काढलेला नाही, मात्र मुद्यांपासून पळ काढणे आपच्या डीएनएमध्ये असल्याचेही त्या म्हणाल्या.

पहिला प्रश्न
निर्मला यांनी आम आदमी पार्टीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले पक्षाचे प्रचारक आणि त्यांच्या लोकेशनचे स्क्रीनशॉट दाखवले. आपसाठी मते मागण्यासाठी दुबई, बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या काही भागामधून फोन येत असल्याचे त्यात दाखवण्यात आले. त्यामुळे आप देशविरोधी तत्त्वांद्वारे प्रचार करत असल्याचे सीतारमण म्हणाल्या. आपला बाहेरच्या लोकांची मदत का घ्यावी लागते? दिल्लीत कार्यकर्त्यांची कमतरता आहे का? असा सवाल त्यांनी आपला केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, भाजपने विचारलेले इतर चार प्रश्न
सर्व फोटो प्रतिकात्मक