आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Shiv Sena Now BJP Break Its Alliance With Akali Dal, Said Sangh

शिवसेनेनंतर भाजपचा अकालीशी काडीमोड, संघाने दिले संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - बिहारात जदयू, महाराष्ट्रात शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजप आता शिरोमणी अकाली दलाशीही फारकत घेण्याची शक्यता आहे. रा.स्व. संघाच्या एका नेत्याने तसे संकेत दिले आहेत. त्यानुसार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कमल शर्मांच्या ऐवजी अकाली दलाच्या विरोधात बोलणारे माजी खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. हरियाणात अकाली दलाने बंडखोर उभे केल्याने भाजपचा रोष आहे.

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांनी राज्यातील जिल्हा, तालुका कार्यकारिणींची फेररचना करून संघटना मजबूत करणे चालवले आहे. मोदी सरकारनेही पंजाब भाजपनेही अच्छे दिनचे स्वप्न दाखवत कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकून भाजप नवा इतिहास रचणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष शर्मा यांनी ९ सप्टेंबर रोजीच केली. दरम्यान, पंजाब सरकारने भाजपचे नवज्योतसिंह सिद्धू यांची वाय दर्जाची सुरक्षा मंगळवारी काढून घेतली.

बंडखोरीमुळे नाराजी
हरियाणात भाजपविरुद्ध लढणा-या उमेदवारांसाठी मते मागून सिद्धू युती तोडत नाहीत. ती तोडण्याचे काम शिरोमणी अकाली दलच करत आहे. त्यांनी उमेदवार उभे केले नसते तर सिद्धू त्यांच्याविरुद्ध बोलले नसते.
डॉ. नवज्योत कौर सिद्धू, संसदीय सचिव, पंजाब