आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित जोगी यांच्या पुत्राच्या दोन जन्मतारखा;भाजपचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांनी त्यांची विविध प्रमाणपत्रे बनवण्यासाठी वेगवेगळ्या जन्मतारखा व जन्मठिकाणांचा वापर केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजप प्रवक्ते संजय श्रीवास्तव यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा दाखला देत म्हटले की, अमितने भारतीय नागरिकत्वासाठी 15 डिसेंबर 2001 मध्ये एक अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1977 ला अमेरिकेतील डलास येथे झाल्याचे नोंदवले. त्यामुळे अमित जोगी छत्तीसगडी होऊ शकत नाहीत. त्यानंतर 26 ऑगस्ट 2002 मध्ये अधिवास प्रमाणपत्रासाठी बिलासपूर येथे अर्ज सादर केला होता. त्या वेळी अमितचे वडील छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. अधिवास प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जात अमितने त्यांची जन्मतारीख 7 ऑगस्ट 1978 व जन्मठिकाण बिलासपूर असा, तर जातीच्या दाखल्यासाठी 27 ऑगस्ट 2004 ला दाखल केलेल्या अर्जात जन्मतारीख 7 ऑगस्ट 1977 आणि जन्मठिकाण गौरेला असल्याचा उल्लेख केल्याचा आरोपही श्रीवास्तव यांनी केला. वेगवेगळ्या जन्मतारखा आणि जन्मठिकाण दर्शवून सरकारी प्रमाणपत्रे हस्तगत करणार्‍या अमित जोगीवर नकली दस्तऐवज दाखल केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानेही दखल घ्यावी, असे भाजपने म्हटले आहे. अजित जोगी यांच्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असताना अमित जोगीला कास्ट सर्टिफिकेट कसे मिळू शकते, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले.

बिलासपूरचे रिटर्निंग अधिकारी घेतील निर्णय
अमित जोगीच्या वेगवेगळया जन्मतारीख व जन्मठिकाणाबाबत बिलासपूर जिल्ह्याचे रिटर्निंग अधिकारीच योग्य तो निर्णय घेतील.

आतापासूनच भाजप मला घाबरली
अमित जोगीने म्हटले, की भारतीय जनता पक्ष आतापासूनच मला घाबरत आहे. भाजप नेते अनंत कुमार, नरेंद्र सिंह तोमर आणि जगत प्रकाश नड्डा यांनीसुद्धा नक्षली हल्ल्यानंतर वडील अजित जोगी यांच्यावर आरोप केले होते. प्रत्यक्षात हा मुद्दा रमण सरकारच्या भ्रष्टाचाराचा आहे.