आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू बिहारचे सुपर सीएम : भाजप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बिहारमध्ये लालूप्रसाद यादव हे सुपर सीएम अाहेत. नितीश कुमार केवळ कठपुतळी आहेत, अशी टीका भाजपने शुक्रवारी केली. लालूंच्या विरोधातील खटले मागे घेण्यात आले आहेत. त्यावरून खुर्ची टिकवण्यासाठी नितीश सर्व काही करायला तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे भाजपने म्हटले आहे.
नितीश कुमार म्हणजे कठपुतळी मुख्यमंत्री आहेत. वास्तविक राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. सत्ताधारी अनेक आमदारांच्या विरोधातही गुन्हेगारीच्या तक्रारी आहेत. या सर्व बाबी लाजिरवाण्या असतानाही कुमार यांना खुर्चीची चिंता वाटते.