आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Felicitate 63 Party Workers Who Were Jailed After Moradabad Riot's

दंगलीतील 63 कार्यकर्त्यांचा गौरव करणार भाजप, 'जेल यात्री' चा किताब देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो प्रतिकात्‍मक)

लखनऊ - भाजपने मुरादाबादमध्ये झालेल्या दंगलींमध्ये तुरुंगवास भोगलेल्या 63 कार्यकर्त्यांना गौरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांवर दंगलीत सहभागी असणे, हत्‍येचा प्रयत्न, नुकसान पोहोचवणे, बेकायदेशीर पद्धतीने एकत्र येणे, पब्‍ल‍िक आणि रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याची प्रकरणे दाखल आहेत. हा गौरव सोहळा 5 ऑक्टोबरला होणार आहे.
कार्यकर्त्यांना या सोहळ्यात 'जेल यात्री' हा किताब दिला जाणार असून, त्यांना स्मृतीचिन्ह, शॉल प्रदान केले जाणार आहे. कांठ परिसरात एका मंदिरावर लावलेला लाऊडस्पीकर हटवण्याच्या विरोधात 4 जुलैला महापंचातय बोलावण्यात आली होती. या दरम्यान, कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद झाले होते. या हिंसाचारात जिल्हाधिकारीही गंभीररित्या जखमी झाले होते. भाजपच्या पदाधिका-यांबरोबरच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे अनेक पदाधिका-यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश भाजपने आग्रा येथे 21 नोव्हेंबर 2013 मध्ये आमदार सुरेश राणा आणि संगीत सोम यांना अमित शाह यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले होते. काही वेळाने त्याच मंचावर मोदींनी प्रचारसभाही घेतली होती. त्यावेळी लक्ष्‍मीकांत वाजपेयी यांनी राणा आणि सोम हे 'हिरो' आणि 'हिंदुंचे रक्षक' असल्याचे म्हटले होते. त्यांच्यावरही दंगली भडकवल्याचे गुन्हे दाखल होते. मात्र दोघांनां नंतर जामीनही मिळाला होता.

कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी...
या कार्यकर्त्यांबरोबर तुरुंगात गेलेले 23 जण अजूनही तुरुंगातच आहेत. त्यामुळे यांचा गौरव केल्याने तुरुंगातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांनी पक्षाचा मुद्दा अत्यंत जोमाने उचलून धरल्याचे भाजप प्रवक्ते अनिल सिंह म्हणाले आहेत.