आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Fields More Muslim Candidates In Jammu And Kashmir

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने दिले ३२ मुस्लिम उमेदवार, ८७ पैकी ७० जागा लढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यंदा आपला धार्मिक कट्टरवादाचा चेहरा बदलून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले असून ४० टक्क्यांहून अधिक मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

भाजप राज्य विधानसभेच्या ८७ जागांपैकी ७० जागांवर निवडणूक लढवत असून यात ३२ मुस्लिम उमेदवार आहेत. काश्मीर खोऱ्यात २५ मुस्लिमांना तर जम्मूमध्ये सहा व लड्डाख क्षेत्रात एका मुस्लिमास भाजपने उमेदवारी देऊ केली आहे. खोऱ्यात चार काश्मिरी पंडित व एका शीख धर्मीयास उमेदवारी देण्यात आली असून लडाख क्षेत्रात तीन बौद्ध धर्मीयांना तिकिटे देण्यात आली आहेत. राज्याचे पक्षप्रभारी अविनाश राय खन्ना म्हणाले, भाजप हा पक्ष काश्मीर खोऱ्यात अस्पृश्य नाही. पक्षाच्या सभांमध्ये सर्वच धर्माच्या लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. राज्यात भाजप चांगला पर्याय आहे.

भाजपची वाटचाल
> २००२ मध्ये १७ मुस्लिम उमेदवार दिले. ५८ पैकी केवळ एकच जागा जिंकता आली.
> २००८ मध्ये ६०० पैकी २४ मुस्लिम व ७ पंडितांना उमेदवारी, ११ जागी विजय.
> २०१४ मध्ये ३२ मुस्लिम उमेदवार व ४४ जागा जिंकण्याचे लक्ष्य