आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपने रामलीला कार्यक्रमात राजकारण आणू नये : सपा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - पुढील आठवड्यात दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या रामलीला कार्यक्रमाचा वापर भाजपने राजकारणासाठी करू नये. खरे तर त्यासाठी लखनउमधील मैदान ‘हाय जॅक ’ करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला आहे.

भाजपने धार्मिक कार्यक्रमात राजकारण करू नये. आपल्या राजकारणासाठी भाजपने लखनऊचा वापर करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता तर समजू शकले असते. परंतु रामलीलासाठी लखनऊच्या मैदानाची निवड करणे तार्किकदृष्ट्या पटणारे नाही. ते मतदारसंघात गेले होते का, असा प्रश्नही समाजवादी पार्टीचे प्रवक्ते अशोक वाजपेयी यांनी केला आहे.

‘सर्जिकल स्ट्राइकवर संशय नको’
सर्जिकल स्ट्राईकवर कोणीही संशय व्यक्त करू नये. आपले लष्कर देशासाठी लढते. त्यांच्या शौर्याकडे अशा नजरेतून पाहणे योग्य होणार नाही, असे सपाच्या वतीने सांगण्यात आले. लष्कराने सांगितलेल्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, असे सपाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...