आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Kanth Mahapanchayat Moradabad Latest News In Marathi

उत्तर प्रदेशात महापंचायतीवरून वाद; दगडफेकमध्ये मुरादाबादचे डीएम गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ/मुरादाबाद- उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कांठमध्ये भाजपच्या महापंचायत पोलिसांनी उधळून लावल्यावरून शुक्रवारी प्रचंड तणाव निर्माण झाला. महापंचायत मध्येच थांबवल्याने विविध संघटनांच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. जमावाने रेल्वे रुळावर जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. नंतर जमाव आणि पोलिस यांच्यात जुंपली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात मुरादाबादचे डीएम चंद्रकांत हे गंभीर जखमी झाले आहेत. परिणामी पाच रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्‍यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
अश्रुधूराचा वापर...
संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधूराचा वापर केला. एवढेच नव्हे तर जमावाला नियंत्रित करण्‍यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्याही छाडल्या.

प्रथमोपचारानंतर जखमी डीएम चंद्रकांत यांत दिल्लीला हलवण्यात आल्याचे समजते. डीएम यांच्या शिवाय एसएसपी धर्मवीर, डीएसपी अर्चना, इंस्पेक्टर सुधीर तोमर आणि तीन सब इंस्पेक्टर जखमी झाले आहेत. दुसरीकडे, अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी चंदौसीचे माजी आमदार गुलाबो देवी, प्रदेशमंत्री कामता करदम, भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा मंजू शर्मा यांना अटक केली आहे..

महापंचायतमध्ये सहभागी झालेले संभलचे खासदार सतपाल सिंह सैनी, रामपूरचे खासदार नैपाल सिंह, अमरोहाचे खासदार कंवर सिंह आणि आमदार संगीत सोम यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सगळ्यांना मुरादाबाद पोलिस लाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. सायंकाळी त्यांची सूटका करण्‍यात येणार आहे.

गृहसचिव कमल सक्सेना आणि आयजी (लॉ अॅण्ड आर्डर) अमरेंद्र सिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबरपूरमधील नयागावमध्ये नेहमी शिवरात्रीनिमित्त लाउडस्पीकर लावण्‍यात येतो. यंदा परंपरेला छेद देत 16 मे रोजी लाउडस्पीकर लावण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने तो काढून टाकला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विरोधात महापंचायतीची घोषणा करण्‍यात आली होती. मात्र, घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

कांठसह परिसरात छावनीचे रुप
महापंचायत उधळून लावल्याने निर्माण झालेल्या तणावामुळे प्रशासनाने कांठसह परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, मुरादाबादचे भाजपचे खासदार सर्वेश सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या पाच अटी मान्य करण्‍यात आल्या होत्या. दोन्ही पक्षातील नेत्यांनी झालेल्या तोडग्यावर स्वाक्षरीही केली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी युटर्न घेतला. त्यामुळे कांठमध्ये पोहोचले सर्वेश सिंह विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी सुचवलेला प्रस्ताव ग्रामस्थांसह भाजपचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनीही फेटाळून लावला.
खासदार सर्वेश सिंहांच्या प्रत‍िकात्मक पुतळ्याचे दहन
खासदार सर्वेश सिंह यांना जमावाने घेराव घातला. नंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. जमावाने खासदार सिंह यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

भाजपचेप्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी सांगितले, की खासदार सर्वेश सिंह यांनी चुकीचा पर्याय सुचवाल्यामुळे कराराच्या प्रती फाडून फेकून दिल्या.

आयबीने जारी केला होता अलर्ट...
मुरादाबादमधील भाजपच्या प्रस्तावित महापंचायतीवरून राज्य गुप्तचर यंत्रणेने (आयबी) प्रशासनाला अलर्ट केले होते. मुरादाबादमध्ये मुझफ्फरनगर सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आयबीने राज्य सरकारला वर्तवली होती. एक समुदायाने पोलिसांवर दगडफेक करण्याची आधीपासून तयारी केली होती.
(फोटो: कांठमध्ये भाजपच्या महापंचायतीवरून झालेल्या दगडफेकमध्ये जखमी झालेले डीएम चंद्रकांत)

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, घटनेशी संबंधित छायाचित्रे...