आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP खासदारांनी ओवेसींना म्हटले दहशतवादी, उपेक्षित जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) नेते आणि खासदार ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. साक्षी महाराजांनी ओवेसींना दहशतवादी म्हटले आहे, तर भाजपचे दुसरे खासदार योगी आदित्यनाथ यांनी ओवेसींना 'उपेक्षित जीव' म्हटले आहे.

साक्षी महाराजांनी रविवारी उत्तर प्रदेशातील एटा येथील त्यांच्या आश्रमात आयोजित पत्रकार परिषदेत ओवेसींवर तोफ डागली. ते म्हणाले, असदुद्दीन ओवेसी मोहम्मद साहेबांचाही दुष्मन आहे. असदुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवेसी हे दोघे भाऊ दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. मी जर त्यांना दहशतवादी करार दिला तर त्यात अतिशोक्ती ठरणार नाही. याकूबच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे बॅकग्राऊंड तपासण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
दुसरीकडे, खासदार योगी आदित्यनाथ म्हणाले, 'ओवेसीला फक्त एकच वाक्य लागू पडते, विनाश काल विपरीत बुद्धी. त्यांचे विचारच राष्ट्रद्रोही आहे. त्यामुळेच ते दहशतवादाला समर्थन देतात.'
बातम्या आणखी आहेत...