आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Amit Shah Conflicting Statements On Azamgarh Latest News

\'आझमगडला अतिरेक्यांचा अड्डा म्हणणारे अमित शहांवर कडक कारवाई व्हावी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आझमगड/बलिया- आझमगड हा अतिरेक्यांचा अड्डा असल्याचा सनसनाटी आरोप करून भाजपचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. शहा यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.
दुसरीकडे, कॉंग्रेसचे महासचिव दि‍ग्विजय सिंह यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे. अमित शहा यांच्यावर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. विकासाचा मुद्दासोडून नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशात सांप्रदायिक भावना भडकविण्याचे काम करत आहे. मोडासा बस स्फोटात आरएसएसच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता, याचा कदाचित दोघांनाही विसर पडला असल्याचे दिग्विजय यांनी ट्‍विट केले आहे.
आझमगड मतदारसंघात रविवारी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शहा बोलत होते. आझमगड हा दहशतवाद्यांचा अड्डा आहे. समाजवादी पक्षाचे सरकार दहशतवादाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या लोकांच्या सुटकेसाठी वकिली करीत आहे. यूपीत सरकारचा अजिबात धाक उरलेला नाही. गुजरात स्फोटातील आरोपी आझमगडचेच होते. त्यांना गृहराज्यमंत्री असताना मी अटक केली होती. त्यानंतर गुजरातमध्ये दहशतवादाची एकही घटना घडलेली नाही, असे शहा म्हणाले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, काय म्हणाले अमित शाह...