आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Leader, B.S.Yeddyurappa Ate Hotel Made Instead Of Meal Prepared By Dalit Family

येदियरप्पांनी दलिताच्या घरी हॉटेलवरून मागवलेले जेवण केल्याचा आरोप; तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांनी एका दलिताच्या घरी जेवल्याच्या बातम्या सर्वच स्थानिक माध्यमांवर देण्यात आल्या. याच प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, येदियुरप्पा यांनी ते जेवण प्रत्यक्षात हॉटेलावरून मागवले होते असा आरोप होत आहे. 
 
काय आहे प्रकरण?
- 19 मे रोजी येद्दींनी चित्रदुर्ग दौरा केला होता. यावेळी ते केलाकोट परिसरात एका दलिताच्या घरी गेले. याच ठिकाणी त्यांनी माध्यमांसोर घरात नाश्ता केला होता. 
- येथील स्थानिक दलित डी. व्यंकटेश याने तक्रार दाखल केली आहे. यानुसार, येदियुरप्पा यांनी प्रत्यक्षात दलिताच्या घरी बनवलेले जेवण खाल्लेच नाही. त्यांच्यासाठी हॉटेलावरून जेवण मागवण्यात आले होते. 
- येद्दींच्या अशा वागण्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल असेही तक्रारकर्त्याने नमूद केले आहे. 
- स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांना मिळालेल्या तक्रारीवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. 
 
येदियुरप्पा काय म्हणाले?
येद्दींनी विरोधकांचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. काँग्रेस आणि जेडीएस आपल्यावर आरोप करून दलितांचाच अपमान करत आहेत. त्यामुळे, अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या विरोधकांनी दलितांची जाहीर माफी मागावी असे येद्दींनी ठणकावले आहे.
बातम्या आणखी आहेत...