आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबंग सासऱ्याने जावयाला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले, विवस्त्र करून केली बेदम मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारहाणीत महिला जखमी झाली. गुन्हा दाखल करण्यासाठी तिला पोलिसांत चकरा माराव्या लागल्या. इन्सेट: आराेपी. - Divya Marathi
मारहाणीत महिला जखमी झाली. गुन्हा दाखल करण्यासाठी तिला पोलिसांत चकरा माराव्या लागल्या. इन्सेट: आराेपी.
सुरत (गुजरात) - आपल्या जावयाचे एका महिलेशी अवैध संबंधांच्या संशयामुळे भाजप नेते प्रवीण कहार यांनी साथीदारांसह मिळून दोघांना न्यूड करून सर्वांसमोर मारहाण केली. दोघांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. वास्तविक, भाजप नेत्याच्या दबावामुळे दोघांनी पोलिसांत तक्रार द्यायला उशीर केला. शेवटी कमिश्नरनी दखल देऊन रांदेर पोलिसांना गुन्हा नोंदवायला सांगितले.
 
महिलेसह जावयाला रंगेहाथ पकडले होते फ्लॅटमध्ये...
- पोलिस सूत्रांनुसार, प्रवीण कहार नगरसेवक आहेत. ते अगोदरच जावई आणि महिलेची रेकी करत होते.
- त्यांनी आपल्या साथीदारांसह जावई जयेश आणि त्याच्या प्रेयसीला रांदेरच्या एका फ्लॅटमध्ये अटक केली.
- भाजप नेत्याने साथीदारांसह मिळून तरुणाला काठी, पाइप, स्कूड्रायव्हर अशा हत्यारांनी मारहाण करत दोघांनाही नग्न केले.
- मग येथून दोघांना कारमध्ये बसवून विवेकानंद ब्रिजच्या कडेला नेले आणि नग्नावस्थेत पुन्हा त्यांना मारहाण केली. महिलेचा चेहरा, हात, छाती आणि नाजूक अंगांवर गंभीर जखमा झाल्या आहेत.
- यादरम्यान गर्दीही जमली होती. पण कोणीच त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. तथापि, यादरम्यान कुणीतरी पोलिसांना माहिती दिली, पण पोलिस आले आणि आमच्या हद्दीतील हे प्रकरण नाही म्हणून निघून गेले.
- यानंतर पीडिता रांदेर पोलिसांत गेली तेव्हा तिची तक्रार घेण्याऐवजी तिच्यावरच अवैध दारू विकत असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.
- शनिवारी महिलेने पोलिस कमिश्नरांची भेट घेऊन न्याय देण्याची विनवणी केली, तेव्हा कुठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
- डीसीपी झोन 4च्या निगराणीत नगरसेवकासहित एक डझन लोकांविरुद्ध छेडछाड, दंगा आदी कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- तथापि, जावयाने अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नाही.
 
अवैध संबंधांचा होता संशय 
- भाजप नगरसेवक कहारला संशय होता की, त्याचा जावई आणि महिलेचे अवैध संबंध आहेत.
- नगरसेवकाने जावयाच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी अनेकांना कामाला लावले होते.
- एका दिवशी त्याला जावई एका महिलेसह एका फ्लॅटमध्ये असल्याची माहिती मिळाली.
- नगरसेवकाने तेथे साथीदारांसह पोहोचून जावई व महिलेला फ्लॅटमध्ये पकडून बेदम मारहाण केली.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...