आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Controversial Poster Share On Social Sites Over BJP UP President

BJP चे वादग्रस्त पोस्टर, युपीचे वस्त्रहरण करताना दिसत आहेत अखिलेश व राहुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- उत्तर प्रदेशचे (यूपी) भाजप नवनिर्वाचित अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य शुक्रवारी पहिल्यांदा काशीचा दौरा करत आहे. मौर्य यांच्या स्वागताची जय्यत करण्‍यात आली आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स झळकले आहेत. दुसरीकडे, भाजपच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्टर शेअर केले आहे. मौर्य यांना श्री कृष्णाच्या रुपात दाखवले असून विरोधी पक्षाच्या नेत्यांना यूपीचे वस्त्रहरण करताना दाखवण्यात आले. त्यात युपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.

कोणी शेअर केले वादग्रस्त पोस्टर...
- रूपेश पांडे नामक व्यक्तीने हे वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. रुपेश पांडेय हा भाजपचा कार्यकर्ता आहे.
- पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा देखील दिसत आहे.
- मध्यभागी उत्तर प्रदेश राज्याला द्रौपदीच्या रुपात दाखवले आहे.
- बसप प्रमुख मायावती, मुख्यमंत्री अखिलेश यादव, आझम खान, असदुद्दीन ओवेसी व राहुल गांधी यांना यूपीचे वस्त्रहरण करताना पोस्टरमध्ये दाखवले आहे.
- 'कलयुग में केशव केवल उपदेश नहीं देते रणभूमी में युद्ध करते हैं।', असे पोस्टरला शीर्षक देण्यात आले आहे.

समाजवादी पक्षाने नोंदवला आक्षेप...
- समाजवादी पक्षाचे माजी मंत्री रीबू श्रीवास्तव यांनी भाजपच्या वादग्रस्त पोस्टरवर आक्षेप नोंदवला आहे.
- मुख्यमंत्र्यांचे असे वादग्रस्त पोस्टरमध्ये सोशल मीडियावर शेअर करणे योग्य नसल्याचे श्रीआस्तव यांनी म्हटले आहे.
- भाजपतर्फे आतापर्यंंत या वादग्रस्त पोस्टरवर कोणत्याही नेत्याने स्पष्टीकरण दिले नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, वादग्रस्त पोस्टरबाबत काय म्हणाले रूपेश पांडेय...