आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Leader From Kashmir Going To Host Beef Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरचे भाजप नेते देणार बीफ पार्टी, हिंदुसाठी असेल व्हेजिटेरियन मेन्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू काश्मीर हायकोर्टाने राज्यात बीफवर बॅन लावला आहे. पण तसे असले तरी याठिकाणचे एक भाजप नेते रविवारी बीफ पार्टी देण्याची तयारी करत आहेत. खुर्शीद अहमद मलिक असे या नेत्याचे नाव आहे. साऊथ काश्मीर मतदार संघामधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. हिंदु आणि मुस्लिम समुदायामध्ये विश्वास वाढावा यासाठी ही पार्टी देत असल्याचे मलिक यांनी सांगितले. या पार्टीत हिंदु बांधवांसाठी शाकाहारी पदार्थ असतील.

हिंदुंसाठी व्हेज आणि मुस्लिमांसाठी नॉनव्हेज
खुर्शीद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या या बीफ पार्टीमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोघांचा समावेश असेल. हिंदुंसाठी व्हेजिटेरियन फूड आहे तर, मुस्लिमांसाठी बीफ असेल. दोन्ही समुदायांना या पार्टीच्या माध्यमातूनधर्मनिरपेक्षतचा संदेश द्यायचा असल्याचे मलिक यांचे म्हणणे आहे.

पक्षाच्या परवानगीची गरज नाही
मलिक यांना यासाठी पक्षाची परवानगी घेतली आहे का असे विचारले तेव्हा ते म्हणाले, हा धर्माचा मुद्दा आहे. मला आता मशिदीत जायलाही पक्षाची परवानगी घ्यावी लागेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचा माझ्या पक्षाचा काही संबंध नाही. मी भाजपमध्ये येण्याचे कारण म्हणजे मला मुस्लिमांच्या भल्यासाठी काम करायचे आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात
जम्मू काश्मीरच्या हायकोर्टाने राज्यात बीफची विक्री बॅन केली आहे. त्यावरून याठिकाणी चांगलाच वाद सुरू आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकरनागमधून त्यांचा पराभव झाला होता. धार्मिक मुद्यांशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. नेता असण्याबरोबरच मी एक मुसलमानही आहे. कोर्ट आमच्या धार्मिक मुद्यात हस्तक्षेप करत आहे, असे मलिक म्हणाले.

जम्मूचे एक वकील परिमोक्ष सेठ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्यात बीफ विक्रीवर बॅन लावला आहे. सेठ आता राज्याचे अॅडव्होकेट जनरल आहेत. तसे पाहता बीफ विक्रीवर राज्यात फाळणीच्या पूर्वीपासूनच बॅन आहे. पण आता हा नियम अधिक कठोरपणे लागू केला जात आहे.