आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Leader Giriraj Singh Controversy Comment On Sonia Gandhi News In Marathi

बेताल बोल : मोदींच्या मंत्र्याची सोनियांवर शेरेबाजी, नायजेरिया नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधींविरुद्ध बरळले. तेही वर्णद्वेशी टिप्पणीच्या माध्यमातून. गिरिराज म्हणाले, राजीव गांधी यांनी एखाद्या नायजेरियन महिलेशी लग्न केले असते, गोरी कातडी नसती तर काँग्रेस पक्षाने त्यांचे (सोनिया) नेतृत्व स्वीकारले असते का? हे वक्तव्य मंगळवारचे आहे.
सिंह बिहारच्या हाजीपूरमध्ये बोलत होते. मात्र, व्हिडिओ बुधवारी समोर आला. त्यावर चौफेर टीकेची झोड उठली. सिंह यांना पदावरून हटवण्याची व पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही केली. मात्र, भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन दुपारपर्यंत म्हणत राहिले की सिंह हे पक्षाचे बडे नेते आहेत. त्यांचे वक्तव्यच ऐकले नसल्याने उत्तर तरी काय देऊ? मात्र, पुढे प्रकरण चांगलेच पेटले. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गिरिराज यांना तत्काळ स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आले.
वादग्रस्त विधानावर दिवसभर वादंग
राजीव गांधींनी जर एखाद्या नायजेरियन महिलेशी विवाह केला असता, गोरी चमडी नसती तर काँग्रेसने तिचे नेतृत्व स्वीकारले असते काय?
राहुल गांधींबाबत म्हणाले : पूर्ण अधिवेशन संपले, राहुल कुठे आहेत? मलेशियाचे एक विमान गायब झाले. त्याचा पत्ता लागला नाही. तसेच राहुलचेही आहे. काँग्रेसचे सरकार असते आणि राहुल पीएम असते तर काय झाले असते?
अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना (नरेंद्र) मोदींनीच प्रशिक्षण दिलेले आहे. आता मोदींनीच त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. -वृंदा करात, माकप
भाजप नेत्यांच्या आई- बहिणीविषयी असे जर कोणी बोलले तर त्यांना ते आवडेल का? ही अत्यंत घृणास्पद अशी टिप्पणी आहे. -लालू प्रसाद, राजद
वादंगानंतर सारवासारव- ऑफ द रेकाॅर्ड अशा गोष्टी होतातच
माध्यमांतून जी वक्तव्ये समोर आली, तशी अनेकदा आॅफ द रेकाॅर्ड लोक आपसात बोलतातच. आतही, बाहेरही. याउपरही सोनियाजी असोत की राहुलजी किंवा कोणीही, माझ्या बोलण्याने जर मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. -गिरिराज सिंह (दुपारनंतर केलेले वक्तव्य)

महिलांचे होणार तरी काय?
सरकारातील मंत्रीच जर महिलाविरोधी आणि वर्णभेदी शेरेबाजी करत असतील, तर देशातील बाकी महिलांचे होणार तरी काय’ - रॉबर्ट वढेरा
नायजेरियाची माफी मागावी
सिंह यांचा शेरा वाईट आहे. आम्ही तक्रार करू. मंत्र्यांनी नायजेरियाच्या जनतेची माफी मागावी.
- ओबी ओकानगोर, नायजेरियाचे उच्चायुक्त