आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने या मंत्र्याची भेट घेत होती GF, 3 प्रकारे केला विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून रविवारी मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. यात 13 पैकी 4 मंत्र्यांना बढती देऊन कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला. त्यापैकीच एक म्हणजे, मुख्तार अब्बास नकवी यांनी हिंदीत मंत्रिपदाची शपथ घेतली. ते अल्पसंख्याक विषयक राज्यमंत्री होते. याच निमित्ताने DivyaMarathi.com नकवी आणि त्यांच्या पत्नी सीमा यांची लव्ह स्टोरी सांगत आहे.
 

कॉलेजला असताना प्रेमात पडले
- उत्तर प्रदेशच्या अलाहाबादला राहणारे आणि अलाहाबाद विद्यापीठातून पदवी पूर्ण करणारे मुख्तार अब्बास नकवी आणि सीमा कॉलेजला असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. नकवी मुस्लिम कुटुंबातून तर सीमा हिंदू परिवारातून होत्या.
- दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात अलाहाबाद विद्यापीठात 1982 मध्ये सुरू झाली. याच कॉलेजमध्ये शिकताना नकवी एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचे नेते म्हणून नावारुपाला आले. तर, सीमा एक शाय टाइप मुलगी म्हणून ओळखल्या जायच्या.
- सीमा यांना मुलांशी जोडले जाणे तर, दूरच त्या मुलांना बोलत सुद्धा नव्हत्या. मात्र, दोघांच्या स्वभावामध्ये फरक असूनही ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
 

सीमा यांच्या आईंचा विरोध
- सीमा यांच्या कुटुंबियांनी नकवी आणि सीमा यांचे रिलेशन नकारले होते. एवढेच नव्हे, तर सीमा यांच्या आईंनी त्यांना नकवींची भेट घेण्यास सक्त मनाई केली होती. तरीही सीमा एक्सट्रा क्लासचे बहाणे करत नकवी यांची भेट घ्यायला जात होत्या. 
- यानंतर दोघांचे प्रेम पाहून अखेर आईसह कुटुंबियांना सुद्धा होकार द्यावा लागला. 
 

1983 मध्ये 3 पद्धतींनी विवाह
- 3 जून 1983 रोजी दोघांनी विवाह केला. हा विवाह तीन परमपरेनुसार करण्यात आला होता. 
- सर्वात आधी कोर्टात नोंदणी करून रेजिस्टर मॅरेज करण्यात आला. यानंतर दोघांनी निकाह केला आणि सात फेरे घेऊन हिंदू पद्धतीने विवाह केला. सीमा एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या, ''मी दुसऱ्या धर्माची आहे, असे मला कधीही वाटले नाही. माझ्या सासरच्या मंडळींनी सुद्धा मला तशी भावना कधीही येऊ दिली नाही.''
- त्यांच्या कुटुंबात दरवर्षी होळी, दिवाळी आणि ईद अतिशय उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या जोडप्याला एक मुलगा असून त्याचे नाव अरशद असे आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...