आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे व्होट बँकेचे राजकारण; माझ्याशी अजूनही स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव - नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- दलित, शोषित आणि आदिवासी हेच माझे कुटुंबीय आहेत. दलित आणि मागासवर्गातूनच मी आलो आहे. माझ्याशी आजदेखील स्पृश्यास्पृश्य भेदाभेद केला जातोय. परंतु आगामी काळ दलित आणि मागासांचाच असेल अशी माझी खात्री आहे, असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले आहे.

कोची येथे केरळ पुलियार महासभा या दलित संघटनेच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना अधिकार दिले आहेत, पण काँग्रेसचा तो लुटण्याचा प्रयत्न आहे. व्होट बँकेचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. गेल्या 60 वर्षांत या पक्षाने फक्त फोडा आणि राज्य करा एवढेच धोरण राबवले. दिल्लीत सरकार असूनही काँग्रेस काहीही करू शकली नाही. हे काम करण्याची संधी आता मला आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.