आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जी पुरुष कि महिला, नक्की सांगता येणार नाही; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते श्यामपद मंडल यांनी पश्चिम मिदनापुर येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर वादग्रस्त विधान केले. "ममता पुरुष आहेत कि महिला हे नक्की सांगता येणार नाही" असे मंडल म्हणाले. यापूर्वीही याच राज्यातील एका भाजप नेत्याने ममता बॅनर्जी यांचे डोके छाटून आणणाऱ्यास 11 लाख रुपये देईन असे विधान केले होते. 
 
तृतीय पंथियांशी तुलना
- भाजप नेते मंडल यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असभ्य शब्द वापरून त्यांची तुलना चक्क तृतीय पंथियांशी केली. मंडल म्हणाले, "आम्ही नाही सांगू शकत, की ममता पुरुष आहेत किंवा महिला... रेल्वे आणि बसमध्ये येणाऱ्या तृतीय पंथियांसारख्या आहेत."
- या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला. भाजप पश्चिम बंगालमध्ये वातावरण खराब करत आहे असे तृणमूलचे कांग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी सांगितले. 
 
ममतांविरोधात यापूर्वीही आक्षेपार्ह शब्द
- एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातील भाजप यूथ नेते योगेश वार्ष्णेय यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे शिरच्छेद करून डोके आणणाऱ्यास 11 लाख रुपये देणार अशी घोषणा केली होती. ममता बॅनर्जी हिंदूंच्या उत्सवांना परवानगी न देता केवळ मुस्लिमांनाच प्राधान्य देतात असे आरोपही त्यांनी लावले होते. संसदेत याचे तीव्र पडसाद उमटले होते.
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...