आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्याला घराबाहेर काढून झाडल्या गोळ्या, मुलांनी जीव वाचवण्यासाठी काढला पळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाघरा (गुमला)- तुरीडीह गावात 6 आरोपींनी बुधवारी (26 नोव्हेंबर) रात्री भाजप नेते बुध्ददेव भगत (65 वर्षे) यांना घरातून बाहेर काढून गोळी मारली. या हल्ल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची दोन मुले जीतेंद्र उरांव आणि सारू उरांव यांनी यावेळी आरोपींच्या तावडीतून पळून जीव वाचवला. मुखवटा घातलेल्या आरोपी वर्दीमध्ये होते. बुध्ददेव भाजपचे शेतकरी मोर्च्याचे जिल्हामंत्री होते.
भडकलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी हत्येच्या विरोधात गुरुवारी (27 नोव्हेंबर) घाघरा विभागीय मुख्यालयामध्ये चांदनी चौकच्या जवळ 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत रस्ता रोको केला. कार्यकर्ते आणि नागरिक आरोपींच्या अटकेची मागणी करत होते.
राजकीय चढाओढीतून झाली हत्या- विजय मिश्रा
भाजप जिल्हा अध्यक्ष विजय मिश्रा यांनी आरोप लावला, की भाजपच्या वाढत्या मजबूत पायाकडे पाहून विरोधी पक्षाने हे कृत्य केले आहे. बुध्ददेव भगत यांच्या खूणाची कसून चौकशी व्हावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्वरीत सुरक्षा पुरवावी अशी मागणी आम्ही सरकारला करत आहोत.
नक्षलवाद्यांनी केली बुध्ददेव यांची हत्या
'बुध्ददेव भगत यांची हत्येच्या मागे राजकिय चढओढ म्हणणे चुकिचे आहे. भाजप नेते बुध्ददेव यांनी हत्या नक्षलवाद्यांनी केली आहे. कारण आरोपी वर्दीमध्ये होते. तरीदेखील पोलिस या घटनेचे धागेदोरे शोधत आहेत. जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल.' -भीमसेन टूटी, एसपी, गुमला
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा घटनास्थळाची छायाचित्रे...