आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Vijay Pandit Shot Dead In Greater Noida

ग्रेटर नोएडामध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, समर्थकांकडून जाळपोळ-तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा - उत्तर प्रदेशातील दादरी नगर पालिकेच्या सभापती गीता पंडित यांचे पती आणि भाजपचे नेते विजय पंडित यांच्या हत्येनंतर नोएडाजवळील दादरी येथे पंडित यांच्या समर्थकांनी रास्ता रोको करुन अनेक गाड्या फोडल्या. मोटरसायकरवर आलेल्या हल्लेखोरांनी विजय पंडित यांच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत विजय यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ही घटना शनिवारी रात्रीची आहे.
विजय पंडित यांच्या हत्येचे वृत्त परिसरात वा-यासारखे पसरले आणि त्यांच्या समर्थकांनी दादरीच्या जी.टी. रोडवर जोरदार प्रदर्शन करत दिसेल त्या वाहनाची तोडफोड करण्यास सुरवात केली. एक डझनपेक्षा जास्त वाहनांची जाळपोळ केली. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही समर्थकांनी दगडफेक केली. यात पोलिस निरीक्षक अशोककुमार शर्मा यांच्यासह पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला असून गौतमबुद्ध नगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.