आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : ओवेसी यांचा ‘जय हिंद’चा नारा, ‘भारत माता की जय’ न म्हणण्यावर ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - ‘भारत माता की जय’ चा नारा देण्यास नकार देणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आरोप ठेवत मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. लखनऊच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर ‘माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, जय हिंद..!’असे ओवेसी यांनी नवी दिल्लीत संसदेत जाण्यापूर्वी सांगितले.

‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार दिल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ओवेसी आपल्या विधानावर ठाम आहेत. या वक्तव्यावरून उद्भवलेल्या वादावर ‘देशाच्या कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या वक्तव्यावरून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास मी कायदेशीर लढाई लढेन,’ असे सांगून ओवेसी संसदेत गेले आणि जाता जाता जय हिंद म्हणाले. ओवेसी यांनी उदगीरमध्ये एका सभेत मानेवर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही. सर्वांनी भारत माता की जय म्हटलेच पाहिजे, असे संविधानात लिहिलेले नाही, असे वक्तव्य केले होते.

... हा हक्कच : जावेद अख्तर
नवी दिल्ली -
भारत माता की जय म्हणणे आमचे कर्तव्य नाही तर हक्कच आह, असे राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य व गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटले आहे. मंगळवारी त्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला तेव्हा केलेल्या भाषणात त्यांनी तीन वेळ ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, देश सोडा : भाजप... सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्‍तव्‍याला दिले ओवेसींचे प्रत्युत्तर.. आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर व्हिडिओत बघा काय म्हणाले ओवेसी...
बातम्या आणखी आहेत...