आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंड उघडले तर भाजप नेते अडचणीत येतील, नितीश कुमारांची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - जदयूने भाजपसोबतचे संबंध संपुष्टात आणल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात मग्न असलेल्या नेत्यांमुळे त्यात आणखी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपण तोंड उघडल्यास अनेक भाजप नेते अडचणीत येतील, अशी धमकी दिली आहे.


गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हुकूमशहा व विघटनवादी नेता असल्याची टीका जदयूने अलीकडेच केली आहे. भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी रविवारी आयोजित येथील सभेत जदयूला फटकारले. 17 वर्षांच्या आघाडीनंतर जदयूला आताचे कसे दोष दिसत आहेत, असे ते म्हणाले. राजनाथ यांनी नितीश यांच्या कॉँग्रेसच्या जवळ जाण्याच्या धोरणावरही टीका केली. पंतप्रधानपदाच्या लालसेपोटी नितीश यांनी मतांचे राजकारण केल्याचा आरोप भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी या वेळी केला. भाजप-जदयूची ताटातूट झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, रालोआचे माजी संयोजक नंदकिशोर यादव, राजीव प्रताप रुडी, शहनवाज हुसेन, सी.पी.ठाकूर, रविशंकर प्रसाद, प्रदेश भाजपाध्यक्ष मंगल पांडे यांनी नीतिश यांच्यावर टीका केली आहे.