आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP नेत्याच्या मुलाने गॅंगरेप करुन बनवला अश्लिल VIDEO, बंदुक घेऊन फिरत होता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- बहुचर्चित बसना गॅंगरेप केसमधील फरार आरोपी आणि भाजप नेते जसवंत सलूजा यांचा मुलगा प्रिन्स सलूजा याला अटक करण्यात आली आहे. लग्न झालेल्या महिलेचे मध्यरात्री घरातून अपहरण करुन जंगलात नेवून सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप प्रिन्ससह इतर आरोपींवर आहे. एवढेच नव्हे तर याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही या आरोपींनी केले होते. घटनेनंतर तिनही आरोपी फरार झाले होते. अटक करण्यापूर्वी तो बंदुक घेऊन फिरताना आढळून आला होता.
महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड
- 11 ऑक्टोबर रोजी पिरदा जंगलात ही घटना घडली होती. माहेरी आलेल्या या पीडित महिलेला मध्यरात्री घरातून उचलण्यात आले होते. त्यानंतर जंगलात नेवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिला तसेच जंगलात सोडून देण्यात आले होते.
- काही लोकांना सकाळी पीडित महिला बेशुद्ध अवस्थेत जंगलात आढळून आली होती. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिने प्रिन्ससह तिघांवर आरोप केले आहेत.
- महंमद अली खान आणि देवेंद्र चौधरी असे इतर दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.
- तिनही आरोपींना सामुहिक बलात्कार करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला होता. तिला रक्तबंबाळ अवस्थेत जंगलात सोडून दिले होते.
पोलिसांची घोडचुक आली अंगलट
- या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचे नाव आणि ओळख जाहीर करुन मोठी घोडचुक केली. त्यामुळे पोलिस आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- तसेच पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षिदाराचेही नाव जाहीर केले. सुरवातीपासून पोलिस संशयास्पद वागत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी निगडित काही फोटो.... असा आहे भाजप नेत्याचा मुलगा प्रिन्स....
बातम्या आणखी आहेत...