आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-कश्मीरमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपने तयार केले 'मिशन 44'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील एकमेव मुस्लीमबहुल राज्य असलेल्या जम्मू-काश्मीरसाठी या महिन्याची 23 तारीख अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण या दिवशी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 23 जून रोजी भाजपचे प्रणेते श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 61 वी पुण्यतिथी आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक असणा-या मुखर्जी यांचा 1953 मध्ये जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून विरोध करताना मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर्षी मुखर्जी यांच्या पुण्यतिथीचा वापर भाजपची सत्ता आणण्यासाठीचे अभियान सुरू करण्यासाठी करण्याचा भाजपचा विचार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात बोलावून 'मिशन 44' ची सुरुवात करण्याचा पक्षाचा विचार आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जम्मू-काश्मीर मध्ये विधानसभेचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात याठिकाणी निवडणुका होणार आहेत.

भाजपचे मिशन 44

भाजपने यंदा होण-या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात विजय मिळवण्याची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपने विजयाचा विचारही केला नव्हता. मात्र आता 87 जागांच्या या विधानसभेमध्ये सत्तेसाठी आवश्यक असणा-या किमान 44 जागांवर विजय मिळवण्याची योजना भाजपने आखली आहे. त्याला पक्षाने 'मिशन 44' असे नाव दिले आहे.

राज्यात सर्वात मोठा पक्ष
लोकसभा निवडणुकांचा विचार करता जम्मू-काश्मीर मध्ये भाजपने 6 पैकी 3 जागा मिळवल्या आहेत. 32.4 टक्के मते मिळवत भाजप याठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपला एकूण 10.15 लाख मते मिळाली. भाजपच्या तुलनेत काँग्रेसला 22.9 टक्के म्हणजे 8.15 लाख, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ला 20.5 टक्के म्हणजे 7.3 लाख तर नॅशनल कॉन्फ्रंसला 11.1 टक्के म्हणझे 4 लाख मते मिळाली. त्यामुळेच भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा विजयासाठी भाजपचा फॉर्म्युला