आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Means Robbers Party, Rahul Gandhi's Answer To Question

भाजप म्हणजे चोरांचा पक्ष, ‘खुनी पंजा’ला राहुल यांचे उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खारसिया - निवडणूक ज्वर जसजसा वाढत आहे, तसतसे भाजप व काँग्रेसमधील शाब्दिक युद्ध भडकत आहे. मोदींच्या खुनी पंजाला उत्तर देताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी ‘भाजप हा चोरट्यांचा पक्ष’ असल्याची जहरी टीका केली आहे. भाजपने छत्तीसगडमध्ये नैसर्गिक संपत्तीची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिवंगत नंदकुमार पटेल यांच्या खारसिया मतदारसंघामध्ये आयोजित सभेत राहुल बोलत होते. राहुल म्हणाले, नंदकुमार पटेल यांच्या पुत्रांकडे माझे एक मागणे आहे. मला एक नव्हे तर 500 नंदकुमार पटेल हवेत. मी ते दिल्लीहून आणू शकत नाही. भाजपसारख्या चोरांना हुसकावून लावू शकणारे येथील समुदायातीलच 500 जण हवे आहेत.
बस्तरच्या जिराम भागात 25 मे रोजी नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात नंदकुमार पटेल यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांचा मृत्यू झाला होता.
जिराम क्षेत्रातील आदिवासी, दलित नागरिकांना विकासकामे करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, असे राहुल म्हणाले. नंदकुमार यांना 25 मे रोजी ठार करण्यात आले. मात्र, सामान्य आदिवासी व दलितांसाठी प्रत्येक दिवस 25 मे आहे. येथील प्रत्येक भागाची जिरामसारखी भयाण स्थिती आहे. 19 नोव्हेंबरच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी नंदकुमार पटेल यांचे पुत्र उमेश पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपची राहुलविरुद्ध तक्रार
नवी दिल्ली । भाजपला चोरांचा पक्ष संबोधणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपने आपल्या तक्रारीत राहुल यांना गुन्ह्यात सतत सहभागी (हॅबिच्युअल ऑफेंडर) व काँग्रेस पक्षाला ‘हिस्ट्री शीटर’ ठरवले आहे.
‘खुनी पंजा’च्या उत्तरासाठी मोदींना चार दिवस वाढवले
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने ‘खुनी पंजा’च्या वक्तव्याबाबत उत्तर देण्यासाठी चार दिवसांचा अवधी वाढवून दिला आहे. मोदी यांनी छत्तीसगडच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजाला ‘खुनी पंजा’ संबोधले होते. निवडणूक आयोगाने मोदी यांना 20 रोजी सकाळी 11.30 पर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले.