आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे बडे नेते झाले मोदी ‘फीव्हर’ने ग्रस्त!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- गोव्यात शुक्रवारी भाजपचे अधिवेशन सुरू झाले खरे, मात्र नाट्यमय घडामोडींनी पहिला अंक रंगला. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत लालकृष्ण अडवाणींनी दांडी मारली, तर अडवाणी यांच्या उपेक्षेने सुषमा स्वराज नाराज असल्याची चर्चाही गाजली. मात्र, त्या दुपारी 1 च्या सुमारास गोव्यात पोहोचल्या. या गोंधळात निवडणूक प्रचार समितीची धुरा मोदींच्या हाती सोपवण्याबाबत निर्णय टळला. याच मुद्द्यावर शनिवार-रविवारी कार्यकारिणीची बैठक होत आहे.

नेते ‘आजारी’: अडवाणींच्या तंबूतील जसवंतसिंह, यशवंत सिन्हा, उमा भारती, रविशंकर प्रसाद, शत्रुघ्न सिन्हा आणि बी.सी. खंडुरी यांनीही अधिवेशनास येण्याचे टाळले.

प्रचार समितीचा वाद
मोदींकडे निवडणूक प्रचार समितीची धुरा सोपवण्यावरून पक्षात मतभेद आहेत. राजनाथ यांच्या मते विधानसभा, लोकसभेसाठी एकच प्रचार समिती असावी, त्याचे प्रमुखपद मोदींना द्यावे. मात्र अडवाणींना ते मान्य नाही. दोन्ही निवडणुकांसाठी स्वतंत्र प्रचार समित्या व प्रमुख असावेत, या मताचे ते आहेत.